.
.
.

आपसातील चर्चेमुळे संशोधनासाठी उर्जा मिळते-डायनामिक व कार्पोरेट ट्रेनर डॉ.स्वामिनाथन

Pandharpur LIVE 12 March 2019


स्वेरीत ‘इलेक्ट्रोकॉम २ के १९’ चे थाटात उदघाटन

पंढरपूर‘जीवनातील प्रत्येक क्षेत्रातील तंत्रज्ञान अवगत असणे गरजेचे असून यासाठी शास्त्रज्ञ असावेच लागते असे नांही. कोणताही प्रॉब्लेम सोडविताना त्यासाठी सोल्युशन हे असतेच परंतु त्याचा शोध घेण्याची मानसिकता असावी लागते.आज आपल्याला काहीही गरज भासेल तेव्हा इंटरनेटवर गुगल वर सर्च करतो पण त्याच्या व्यतिरिक्त ही आपली संशोधन करण्याची मानसिकता तयार केली पाहिजे. यासाठी सर्वात महत्वाचे ह आहे की आपसात चर्चा करा आणि या चर्चेमुळे आपलाच उत्साह वाढतो आणि पर्याय मिळतो. याच उर्जेतून नवीन  संशोधन निर्माण होत असते. असे प्रतिपादन आहे. डायनामिक व कार्पोरेट ट्रेनर डॉ.इ.व्ही. स्वामिनाथन यांनी केले.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टीट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘इलेक्ट्रोकॉम २ के १९’ या राज्यस्तरीय तांत्रिक उपक्रमाच्या आयोजनाप्रसंगी  प्रमुख पाहुणे म्हणून डायनामिक व कार्पोरेट ट्रेनर डॉ.इ.व्ही. स्वामिनाथन हे  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार होते. ट्रेनिग अँण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता डॉ. एम.के. राऊळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. इलेक्ट्रोनिक्स अॅन्ड टेलेकम्युनिकेशन इंजीनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. ए.एस. विभुते  यांनी प्रास्तविकात विद्यार्थ्यांच्या  सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्वेरीमध्ये अशा प्रकारे अनेक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून  ‘इलेक्ट्रोकॉम २ के १९’ याचे आयोजन करण्यात आले असून ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील टॅलेंट असतात अशाच विद्यार्थ्यांसाठी हे संशोधनात्मक व्यासपीठ तयार केले असून अशा राज्यस्तरीय उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा विकास अधिक गतीने होईल.’असे सांगितले. ‘इलेक्ट्रोकॉम २ के १९’  मध्ये विविध स्पर्धांचा समावेश केला असून यात पोस्टर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट कॉम्पिटीशन अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. या प्रत्येक उपक्रमातील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीसे व सन्मान चिन्हे दिली जाणार असून प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रशस्ती पत्रक दिले जाणार आहेत. 


या कार्यक्रमामध्ये अभियांत्रिकीच्या डिप्लोमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच ऐनवेळी इच्छुक विद्यार्थी महाविद्यालयात येऊन आपला सहभाग नोंदविला होता. संस्थेचे सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली  प्राध्यापक व  विद्यार्थ्यांनी या उपक्रमात परिश्रम घेत होते. यावेळी सोलापूर शासकीय महाविद्यालयाचे प्रा. एस. आर. पंखे, विणा एंटरप्रायझेसचे चेतन विभूते, सुरज डोके, भारती विद्यापीठ कोल्हापूरचे प्रा. प्रमोद खराडे, साताऱ्याचे संतोष कदम यांनी परीक्षकांची भूमिका उत्तमरीत्या पार पाडली. या निमित्ताने दोन्ही विभागांची आकर्षक सजावट केली होती. प्रत्येक विभागातील प्रत्येक हॉलमध्ये स्पर्धकांचे प्रोजेक्ट व पेपर्स प्रेझेन्टेशन सुरु होते. अध्यक्षीय भाषणातून अधिष्ठांता डॉ. पवार म्हणाले की, ‘कोणत्याही विभागातील संशोधक कोणत्याही प्रकल्पांचा संशोधन करू शकतो त्यासाठी प्रथम संशोधनासाठी पाया महत्वाचा असतो. यासाठी अशा स्पर्धात्मक व्यासपीठामुळे संशोधन करणे सहज शक्य होते.’ असे सांगून ‘खर्डी’ पासून ते ‘आय.आय.टी. गुवाहाटी’ दरम्यानच्या शैक्षणिक व संशोधनातील विविध अनुभव सांगितले. डॉ. पवार यांनी स्वेरीसाठी अवघ्या बारा वर्षात सतरा नवीन प्रोजेक्टसाठी जवळपास सात कोटी रुपयांचा निधी मिळविला आहे. यावेळी वैभव मछाले, आदित्य कोठारे, स्वेरीचे माजी विद्यार्थी अजिंक्य मछाले, कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.एन.डी. कारंडे, प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजीत गिड्डे, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्रा. आर.डी. कुलकर्णी, इतर प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील जवळपास चारशे संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. समन्वय प्रा.नीता कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget