.
.
.

...आणि ईशाला कळतो विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा

Pandharpur LIVE 29 March 2019


 'तुला पाहते रे' मालिका आता रंजक वळणावर येऊन पोचलीय.  विक्रांत सरंजामे हाच गजा पाटील हे आता प्रेक्षकांना कळलंय. पण मोठा प्रश्न हा आहे की हे ईशाला कधी कळणार? आणि कळल्यावर विक्रांतवर जीव ओवाळून टाकणारी ईशा कशी वागणार?
पुढच्या काही भागांमध्ये याचा उलगडा होणार आहे. इतके दिवस ईशाला विक्रमनं सांगितलं की त्या माणसाचं नाव कोणाला सांगू नकोस म्हणून. पण चाणाक्ष ईशाच्या मनात बरेच प्रश्न निर्माण होतात. त्यातूनच येणाऱ्या एपिसोडमध्ये ईशाला विक्रांत हाच गजा पाटील कळतं. पुन्हा तो सरंजामेंचा जावई आहे हेही कळतं आणि धक्का बसतो.
विक्रांतचा सगळा डावच तिच्या समोर उघड होतो. ती विक्रांतचा तिरस्कार करायला लागते. इकडे अगोदर ईशाशी प्रेमाचं नाटक करणारा विक्रांत आता खराखुरा तिच्या प्रेमात पडायला लागलाय. आता ईशाला कुठल्याही परिस्थितीत त्याला गमवायचं नाहीय.

खालील लिंकला क्लीक करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा Pandharpur Live  चे अन्ड्रॉईड अ‍ॅप्लीकेशन.  https://play.google.com/store/apps/details 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 

कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर 

Mail- livepandharpur@gmail.com 


Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget