.
.
.

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडून संशोधनात वाढ होण्याची गरज -डॉ. मृणालिनी फडणवीस

Pandharpur LIVE 29 March 2019पंढरपूर (प्रतिनिधी) अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांना आर्थिक सहाय्य पेटंट फाईल करण्याची सुविधा विद्यार्थ्यांना मिळत असुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या माध्यमातून इनक्युबेशन सेंटर सुरू केले आहे. भारतीय अभियंते जगभरातील नामांकित विद्यापीठामध्ये काम करीत आहेत. पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात हे अगदी अल्पावधीतच यशस्वीपणे पणे वाटचाल केली असुन अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संशोधन वाढ होण्यासाठी गरज असून तसे प्रयत्न केले पाहिजेत, असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी पंढरपूर येथील एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील "सिंहगड टेक्निकल सिम्पोझियम-२०१९" या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

खालील लिंकला क्लीक करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा Pandharpur Live  चे अन्ड्रॉईड अ‍ॅप्लीकेशन.  https://play.google.com/store/apps/details 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 

कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर

Mail- livepandharpur@gmail.com 

 कोर्टी (ता पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शुक्रवारी सकाळी १० वाजता "सिंहगड टेक्नीकल सिम्पोझियम-२०१९” या कार्यक्रामाचे उद्घाटन विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. डॉ. मृणालिनी फडणवीस,संस्थेचे सहसचिव संजय नवले, सिंहगड इन्स्टिट्युटच्या संचालिका डॉ. आशा बोकील, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे आदी मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्याती सावित्रीबाई फुले व सरस्वती प्रतिमा पूजन करून दीपप्रज्वललाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.  
   कार्यक्रमाच्या सुरवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे प्रास्ताविक करताना म्हणाले, विद्यार्थ्याच्या सर्वागीण विकासाठी महाविद्यालयाने"सिंहगड टेक्नीकल सिम्पोझियम-२०१९” आयोजित केला असून अगदी कमी कालावधीत विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल केली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी पंढरपूर सिंहगड विविध स्पर्धा आयोजित करत असल्याचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले. या दरम्यान सिंहगड इन्स्टिट्युटच्या संचालिका डॉ. आशा बोकील यांनीही मनोगत व्यक्त केले.
    यावेळी हॅकॅथाॅन-२०१९,  "बेस्ट बिझनेस प्लॅन स्पर्धेचे" ई-यंत्र कल्पना स्पर्धा -2019, सिव्हिल, मेकॅनिकल अँड औद्योगिक इंजिनिअरींग या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात डिझाईन आणि मेन्टन्स ऑफ सोलार ईक्युपमेन्टस या विषयावर दोन दिवशीय कार्यशाळा आदीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.ह्या स्पर्धा  यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी परीश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव कोळवले व स्वामिनी कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. अमोल जगदाळे यांनी मानले.Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget