.
.
.

१५ मार्चला ४८ मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणार- आंबेडकर

Pandharpur LIVE 12 March 2019


काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबतचे चर्चेचे सर्व पर्याय संपले आहेत. आता त्यांच्यासोबत पुढे जाणे शक्य नाही. १५ मार्च रोजी राज्यातील संपूर्ण ४८ मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले जातील अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. राष्ट्रवादी पक्षासाठी तरी शरद पवारांनी माढ्यातून लोकसभा लढवावी असा उपरोधिक सल्लाही आंबेडकर यांनी दिला आहे.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यात याबाबतची घोषणा केली. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही याबाबत वारंवार चर्चा करण्याबाबत आग्रही होतो. मात्र, काँग्रेस पक्ष यात कोणतेही ठोस भूमिका घेताना दिसत नाही. आता निवडणूक जाहीर झाली आहे. आणखी यांची वाट पाहणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही १५ मार्च रोजी राज्यातील संपूर्ण ४८ मतदारसंघातील उमेदवार जाहीर करू असेही आंबेडकरांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत आघाडी करायचीच नव्हती असा जो सूर उमटत होता त्याला आता पुष्टी मिळाली आहे. प्रकाश आंबेडकरांनी सर्वप्रथम १२ जागांची मागणी केली. त्यानंतर वंचितने आपले उमेदवार जाहीर केलेल्या २२ जागांवर दावा केला. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांना काँग्रेससोबत आघाडी करायची नसल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत काही डाव्या व दलित चळवळीतील विचारवंत व पुरोगामी मंडळींनी आंबेडकरांना पत्र लिहून आपण फॅसिस्टवादी व जातीयवादी पक्षाला अप्रत्यक्षरित्या मदत करणार का? असा सवाल केला होता. मात्र, आंबेडकरांनी यावर भाष्य करणे टाळले आहे.


प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्त्वाखालील वंचित बहुजन आघाडीला राज्यभरात चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. रामदास आठवले भाजपसोबत गेल्यानंतर दलित समाजात एक नेतृत्त्वाची पोकळी निर्माण झाली होती. मात्र, कोरेगाव भीमा घटनेनंतर प्रकाश आंबेडकर चांगलेच आक्रमक झाले. त्यामुळे दलित समाजातील विचारी लोकांसह सर्व सामान्य जनतेने आंबेडकरांचे नेतृत्त्व मोठ्या प्रमाणात स्वीकारले. यानंतर आंबेडकरांनी मुस्लिम व राजकीय संधीपासून वंचित असलेल्या ओबीसी वर्गाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. यात आंबेडकर यशस्वी झाले. खासदार औवेसी यांच्यासमवेत जमवून घेत आंबेडकरांनी धनगर, माळी व बारा बलुतेदार समाजालाही जोडून घेण्यात यश मिळवले. वंचितने मागील चार महिन्यापासून वेगवेगळ्या भागात सभांचा धडाका लावला आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget