महुद बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा सर्व्हर डाउन इंटरनेट बंद मुळे व्यवहार ठप्प.... बँकेसमोर खातेदारांची गर्दी नागरीकातुन संतापाची लाट..

Pandharpur LIVE 9 March 2019सांगोला/प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील महुद येथील राष्ट्रीयकृत बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा सर्व्हर व नेट बंद असल्याने देवाणघेवाण पुर्णत: गेल्या काही दिवसापासुन बंद असुन सर्वसामान्याचे व्यवहार ठप्प झाले आहेत तर  बँकेचे एटीएम मशीन सुध्दा बंद असल्याने बँकेच्या ढिसाळ कारभाराबद्द्ल खातेदारातूंन संतापाची लाट उसळली आहे बँकेसमोर खातेधारकांची गर्दी असल्याचे दिसत आहे.वरिष्ठ अधिकाय्रांनी लक्ष देवुन प्रश्न सोडवावा अशी मागणी होत आहे.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
महुद बुद्रुक  परिसरातील शाळेचे विद्यार्थी,महिला ज्येष्ठ नागरीक,शेतकरी वर्ग बँकेसमोर दिवसभर बसल्याचे चिञ पहावयास मिळत होते.सर्वसामान्य माणसांच्या ,शेतकय्रांच्या खात्यावर कमीत~कमी रक्कम त्याने गरजेला येईल या उद्देशाने बँकेत ठेवलेली असते आडचणीच्या काळात कामाला येईल हा त्याचा उद्देश असतो.त्यामुळे ,वेळेवर पैसे जर त्या माणसाला  सर्वर डाउन,नेट बंदमुळे मिळत नसतील तर काय उपयोग असा खातेदार सांगत होता महुद बुद्रुक,कटपळ,गायगव्हाण,खिलारवाडी,महिम,लक्ष्मीनगर,लोटेवाडी,खवासपुर,चिकमहुद,बंडगरवाडी,आदी गावातील नागरिकांच्या लाखो रुपयांच्या ठेवी व सेव्हींग खाती आहेत. गेल्या काही दिवसापासुन इंटरनेट बंद  झाल्यामुळे या भागातील नागरिक व खातेदारांची गैरसोय झाली शेतकय्रांच्या गैरसोयीवर बँकेने जाणीपुर्वक दुर्लक्ष केले आहे व्यवहार ठप्पमुळे नागरीकांची कुंचबना झाली महुद परिसरातील सर्वसामान्यांची आधारवाड असणाऱ्या या बँकेचे कामकाज पुर्वपदावर येण्यासाठी संबधीत वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महुद ता सांगोला येथे बँकेच्या समोर महिला वर्ग,शेतकरी,नागरीक इंटरनेट कधी सुरु होईल वाट पहात असल्याचे दिसत आहे.व्यवहार बंदमुळे बँकेसमोर खातेदारकांची गर्दी दिसत आहे.
~ मा संतोश येडगे
 महुद
मी महुदच्या बँक आँफ महाराष्ट्र बँकेत पैसे काढण्यासाठी आलो होतो.नेट बंद असल्याने पैसे काढता आले नाहीत त्यामुळे बराच वेळ थांबुन रिकाम्या हाताने पैसे न घेताच परतलो.
~न्यानेश्वर वाघमोडे
बंडगरवाडी
कटपळ वरुन घरुगुती कामासाठी पैसे काढण्यासाठी आलो असता एटीएम मशीन बंद होती.त्यामुळे पैसे काढता आले नाहीत.बँकेतही व्यवहार ठप्प असल्याचे दिसुन आले.
~ बालाजी शिंदे
सामाजिक कार्यकर्ते कटपळ
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget