.
.
.

कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर नेतृत्व महत्वपूर्ण ठरते-डी.टी.इ.चे माजी संचालक डॉ एन. बी. पासलकर

 Pandharpur LIVE 27 March 2019


स्वेरीत अॅशरे चॅप्टरचे थाटात उदघाटन
पंढरपूर- ‘आपण कोणतेही कार्य करत असताना वरीष्ठांकडून मार्गदर्शन घेत असतो. त्या आत्मविश्वासपुर्ण मार्गदर्शनामुळे आपण निश्चिंत होवून जबाबदारीने कार्य करतो आणि हाती घेतलेल्या कार्यात यशस्वी होतो. याच यशस्वीतेसाठी केलेले मार्गदर्शन लाख मोलाचे ठरते. एकूणच उत्कृष्ठ मार्गदर्शनामधून नेतृत्वाचे गुण डोकावताना अपेक्षित यश मिळत असते. यासाठी प्रत्येक कार्यात ‘नेतृत्व’ ही महत्वाची भूमिका बजावत असते. असे प्रतिपादन डी.टी.इ.चे माजी संचालक डॉ एन. बी. पासलकर यांनी केले.
           येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टीटयूट संचलीत अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अॅशरे तथा ए.एस.एच.आर.ए.इ. (अमेरिकन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटींग अॅण्ड एअर कंडीशनिंग इंजिनिअर्स)च्या पंढरपूरच्या स्टुडंट चॅप्टरच्या उदघाटन प्रसंगी आयोजिलेल्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून डी.टी.इ.चे माजी संचालक डॉ एन. बी. पासलकर मार्गदर्शन करत होते. प्रस्तावनेत स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी अॅशरे बद्धल महत्वपूर्ण माहिती दिली. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा. सचिन गवळी यांनी अॅशरे कार्यक्रमात रेफ्रीजरेशन अॅण्ड एअर कंडीशनिंगच्या तंत्रज्ञान बाबतीत सविस्तर माहिती दिली. स्टुडंट चॅप्टरचे यश कारखानीस यांनी अॅशरेच्या संशोधनाशी निगडीत महत्वाची माहिती दिली. अॅशरे पुणेचे अध्यक्ष प्रवीण साळुंखे यांनी अॅशरेची माहिती सांगून त्याचा विस्तार व कामाचे स्वरूप स्पष्ट केले. अॅशरेचे सदस्य सुहास देशपांडे यांनी अभियांत्रीकीचे महत्व सांगून सदस्य झाल्यानंतर होणाऱ्या फायद्यावर माहिती दिली. पनवेल महाविद्यालयाचे प्रा.अविनाश शालीग्राम यांनीदेखील कार्यक्षेत्र आणि त्यातील स्पर्धा याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली. पुढे बोलताना माजी संचालक डॉ. पासलकर म्हणाले की, ‘ आपली शिक्षण पद्धती सुधारली पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्यानंतर फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकावर भर दिल्यास मिळणाऱ्या यशाला अधिक गती येईल.’ असे सांगून एम.पी.एस.सी सारख्या स्पर्धा परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना कशी उत्तरे द्यावी ?  याबाबत मार्गदर्शन केले.यानंतर तज्ज्ञ व्याख्याते मार्गदर्शन केल्यानंतर नवीन तंत्रज्ञानावर आधारित चर्चा व मार्गदर्शन या कार्यक्रमावर भर देण्यात आला. ‘अॅशरे’ही जागतिक संस्था असून यामध्ये पन्नास हजाराहून अधिक सदस्य कार्यरत आहेत. अशा ‘अॅशरे’ची स्वेरीत उदघाटन झाले असून याचा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना भविष्यात फायदा होणार असून यामुळे विविध देशात वेगवेगळ्या स्पर्धांसाठी सहभागी होण्याच्या संधी देखील उपलब्ध होणार आहे. यावेळी अॅशरे चॅप्टरचे सदस्य अशोक रानडे, डॉ. पद्माकर केळकर, सुदर्शन नातू, अतुल मराठे यांच्यासह कॉलेज ऑफ इंजिनियरिंगच्या मेकॅनिकल विभागाचे प्राध्यापक, बालाजी सुरवसे, जगदीश पिसे, सुनील मिस्कीन यांच्यासह ‘अॅशरे’चे स्वेरीतील पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी पाहुण्यांची ओळख करून कार्यकर्माचे सूत्रसंचालन केले तर स्वेरीतील अॅशरेचे विद्यार्थी अध्यक्ष वीरेंद्र महाजन यांनी आभार मानले.

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget