.
.
.

धक्कादायक.... पुजार्‍याची मंदिरातच हत्या

Pandharpur LIVE 3 March 2019


जामखेड- भजनाची तयारी करण्यासाठी दत्त मंदिरात गेलेल्या पुजाऱ्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमधील जामखेड येथे घडली आहे. दत्त मंदिराचे पुजारी कुशाबा शिकारे (वय ५०) यांची हत्येमागील कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. 


शिकारे वस्ती येथे घराजवळच बांधण्यात आलेल्या दत्त मंदिरात कुशाबा शिकारे पुजारी म्हणून काम पहात होते त्यांना गायन, भजन व कीर्तनाचीदेखील आवड होती. शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शिकारे महाराज हे दत्त मंदिरात भजन आसल्याने तयारी करण्यासाठी मंदिरात गेले होते. मंदिरात प्रवेश करताच अचानक एक अज्ञात इसमाने त्यांच्या तोंडावर व गळ्यावर धारदार शस्त्राने पाच ते सहा वार केले आणि अंधाराचा फायदा घेत मंदिराच्या मागच्या बाजूने पळ काढला. जखमी झालेल्या शिकारे यांनी मदतीसाठी हाका मारायला सुरुवात केल्यावर त्यांचा मुलगा व पत्नी मंदिराकडे धावत गेले आणि त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले शिकारे महाराज दिसले. या नंतर त्यांच्या मुलाने व गावातील व्यक्तीने त्यांना मोटारसायकलवर खर्डा येथील दवाखान्यात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना घेतले नसल्याने पुढील उपचारासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयत दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. 
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, माजी सरपंच सुनिल कोठारी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र शिकारे महाराज यांची हत्या कोणत्या कारणाने झाली हे अद्याप समजू शकलेले नाही याचा तपास पोलीस करीत आहेत. त्यांच्यावर सकाळी ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुखणे बरे करण्यासाठी महाराजांकडे जात असताना ते दुखणे बरे न होता वाढतच गेले या आंधश्रद्धेतून व महारांजामुळेच माझ्या आजोबांनी आत्महत्या केली याचा मनात राग धरून भावकीतीलच व्यक्तीने पुजारी कुशाबा शिकारे यांची धारधार चाकूने वार करून हत्या केली. या नंतर आरोपीने स्वतःच्या हातावर वार करुन आत्महतेचा प्रयत्न केला. शंकर सोपान शिकारे (वय २५) रा. शिकारे वस्ती, बाळगव्हान. ता. जामखेड असे आरोपीचे नाव आहे. 
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget