.
.
.

हाती शिवज्योत घेत अमोल कोल्हेंचा रॅलीत सहभाग

Pandharpur LIVE 23 March 2019


राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा सध्या प्रचार दौरा चालू आहे. शनिवारी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात आहे. पुणे-आळंदी मार्गावरून कोल्हे प्रचार दौऱ्यासाठी जात असताना त्यांना मार्गावरून काही शिवप्रेमी तरुण शिवज्योत रॅली काढत असल्याचे दिसले. त्यांनी वेळ न दवडता या रॅलीमध्ये सहभाग घेतला. तसेच महाराजांच्या तरूण मावळ्यांसोबत दौडले असल्याचे समाधान कोल्हे यांनी व्यक्त केले.
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी संपूर्ण वातावरण शिवमय झालेले असताना कोल्हे यांनी सहभाग घेतल्याने रॅलीत सहभागी असलेल्यांचा आनंद द्वीगुणीत झाला. स्वतःच्या हातात शिवज्योत घेऊन कोल्हे हे अनवाणी पायांनी धावले.


‘महाराजांच्या तरुण मावळ्यांसोबत दौडल्याने समाधान’
‘आज सकाळी पुणे-आळंदी मार्गावरून जात असताना शिवप्रेमी तरुणांनी काढलेली शिवज्योत रॅली दिसली आणि माझे पाय आपोआप रॅलीकडे वळले. थोड्या अंतरासाठी मीही रॅलीमध्ये सहभागी झालो. काही पावले महाराजांच्या तरुण मावळ्यांसोबत दौडल्याने समाधान मिळाले. महाराजांचे आपल्यावर असणारे ऋण तर कधी फिटणारे नाहीत. या महाराष्ट्राच्या मातीला महाराजांनी शिकवलेला अभिमान आणि स्वबळावर विश्वास यांवर आधुनिक महाराष्ट्र आजही उभा आहे. माझ्या वतीने मी ज्यांचे विचार, कर्तृत्व आणि मुल्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. त्या छत्रपती शिवाजी महाराज यांना मी त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः नमन करतो’, अशा भावना कोल्हे यांनी व्यक्त केल्या.

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget