.
.
.

भारतीय विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषयांची वाटते सर्वाधिक भीती: सर्व्हे

Pandharpur LIVE 23 March 2019


~ ताण आणि स्वतःच्या कामगिरीविषयी भीती वाटणे अशा समस्या परीक्षा काळात सर्रास उदभवतात ~
मुंबई, २३ मार्च २०१९: देशात परीक्षा मोसमाची सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांनी ही कसून अभ्यासाची तयारी सुरु केली आहे. याखेरीज ते स्वतःला चिंतामुक्त ठेवण्याचा प्रयत्न देखील करीत आहेत. परंतु, विद्यार्थ्यांचा परीक्षांकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन समजवून घेण्यासाठी ब्रेनली या जगातील सर्वात मोठ्या पिअर-टू-पिअर लर्निंग कम्युनिटीने नुकत्याच केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार गणित आणि विज्ञान या दोन विषयांची अधिक भीती विद्यार्थ्यांमध्ये दिसली. तसेच विद्यार्थ्यांना ताण आणि कामगिरीविषयी भीती वाटणे अशा समस्या परीक्षा काळात सर्रास उदभवत असल्याचे ही निदर्शनास आले. जवळपास प्रत्येक विद्यार्थी या मनस्थितीचा सामना करत असतो.

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com 


या सर्वेक्षणात मुंबईसह उर्वरीत भारतातील सुमारे ५००० विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला. यामधून परीक्षा दरम्यानचे चित्र स्पष्ट व्हायला मदत झाली.  ६५% प्रतिसादकर्ते या दोन विषयांच्या तयारीवर जास्त भर देणार असल्याचे समजले. तर ६४% जणांच्या मते या विषयातील तयारीत लवकर सुधारणा करणे आवश्यक आहे. गणित तसेच विज्ञान या दोन विषयांतील संकल्पना व्यवस्थित समजावून घेण्यासाठी वेगळ्या पद्धतीची गरज आहे, हे या सर्व्हेक्षणाच्या निरीक्षणात आढळले. इतर विषयांसोबतच या दोन विषयांच्या तयारीसाठी विद्यार्थी काही पद्धतींचा अवलंब करतात असे दिसून आले. पुस्तके आणि नोट्सना सर्वाधिक ६०% प्रतिसाद मिळाला असला तरीही ऑनलाईन पर्याय आणि स्त्रोत (३०%) तर उत्तम आकलन आणि अभ्यासाकरिता (१०%) प्रतिसाद नोंदवण्यात आला.
प्रतिसादकर्त्यांनी परीक्षेदरम्यान केलेला अभ्यास विसरायला होण्याविषयी सर्वाधिक भीती व्यक्त केली. हेच विद्यार्थी पालक-इतरांच्या अपेक्षांना पात्र ठरण्याव्यतिरिक्त अपयश टाळण्यासाठी, उत्तम कामगिरीकरिता स्वत:च्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत असल्याचे स्पष्ट झाले. परीक्षेच्या ताणापासून मुक्त राहण्याकरिता विद्यार्थ्यांमध्ये संगीत ऐकण्याला सर्वाधिक पसंती दिसून आली तर सिनेमा पाहणे, गेम्स खेळणे, वामकुक्षी घेणे इत्यादी इतर पर्यायही विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असल्याचे आढळले. संपूर्ण भारतातील विद्यार्थी परीक्षाकाळात नेमक्या कशा परिस्थितीतून जातात, उत्तीर्ण होण्यासाठी करण्यात येणारे व्यापक प्रयत्न याचे चित्र सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले.
ब्रेनलीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी माइकल बोरकोवस्की म्हणाले की, “ब्रेनलीकरिता भारत ही वेगाने वाढणारी कम्युनिटी आहे. भारतीय विद्यार्थी परीक्षांच्या परिणामांविषयी जागरूक आहेत, ते सातत्याने शिक्षणाचे प्रभावी पर्याय शोधत असतात. मुंबईतील विद्यार्थ्यांना गणिताची सर्वाधिक काळजी वाटते. आमच्या मंचावर ज्या पद्धतीच्या प्रश्नांचा ट्रेंड सुरू असतो त्यामध्ये हे प्रतिबिंब जाणवते. आमच्या ग्लोबल कम्युनिटीच्या मदतीतून यावर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असून शिक्षक-पालकांनीही सातत्याने या समस्येचे निराकरण करणे आवश्यक ठरते.” 


Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget