तरुणांनो , देशासाठी दिवसातील केवळ एक तास द्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष रामगोपाळ काका

Pandharpur LIVE 3 March 2019


‘मिशन मोदी अगेन पीएम’च्या बैठकित केले मार्गदर्शन
पंढरपूर- ‘आज भारत विकासाच्या दिशेने धावत आहे, विकास महासत्तेच्या उंबरठ्यावर येवून ठेपला असून यासाठी सर्वांकडून  सहकार्याची अपेक्षा आहे. त्यासाठी आपण देशासाठी दिवसातून केवळ एक तास समाज सेवा करा आणि पहा आपला देखील विकास दूर राहणार नाही. केवळ देशासाठी एक तास द्या. यातूनच घरोघरी मोदी तयार होतील. आज देशाला मोदी सारख्या नेतृत्वाची गरज आहे, जेव्हा सर्वजण सहकार्य करतात, त्याचवेळी  देशाचा विकास होतो.’ असे प्रतिपादन ‘मिशन मोदी अगेन पीएम’या महत्वपूर्ण कृतीगटाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष रामगोपाळ काका यांनी केले.

              येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये ‘मिशन मोदी अगेन पीएम’या महत्वपूर्ण कृतीगटाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष रामगोपाळ काका हे महत्वाच्या बैठकीसाठी आले असताना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत होते. यावेळी कार्यकारी अध्यक्ष रामगोपाळ काका मार्गदर्शन करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिश्रमपूर्वक कामाचा अनुभव सांगत होते. ‘मिशन मोदी अगेन पीएम’चे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बी. पी. रोंगे यांनी स्वागत केले आणि स्वेरीच्या वाटचालीसंबंधी माहिती दिली. केंद्रात सत्तेवर असलेल्या व कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जनतेने पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी ‘मिशन मोदी अगेन पीएम’च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com पुढे मार्गदर्शन करताना कार्यकारी अध्यक्ष रामगोपाळ काका म्हणाले की,’ पंतप्रधान मोदी हे अत्यंत नियोजनपूर्वक अभ्यास करून कामे करत आहेत. आज त्यांना सहकार्याची गरज असून देश महासत्तेच्या मार्गावर असताना आपले देखील त्यात योगदान असावे. या निमित्तने भारतभर माझ्यासारख्या अनेक पदाधिकाऱ्यांचा दौरा सुरु असून याला सर्वत्र प्रतिसाद मिळत आहे. आज मी प्रवासामध्ये थकलो होतो परंतु मला स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे प्रसन्न चेहरे दृष्टीस पडले आणि मी ताजातवाना झालो.’ असे सांगून शिक्षण आरोग्य, क्रीडा, सामाजिक राजकीय क्षेत्रात विकासात्मक बदल झाले असून आपल्यावरील जबाबदारी ओळखून कार्य करावे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्खाली भविष्यकाळात जगाच्या नाकाशात भारताची स्वतंत्र ओळख असेल आणि ती वेळ आत्ता आली आहे.’ असे सांगून  मोदींच्या कार्याची चित्रफित सादर केली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी दिनेश तिवारी, सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी शिवानंद हिप्परगे तर पश्चिम महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी आरजू जाजूदिया यांची निवड करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून येणाऱ्या अडचणी व त्यावर पुढील नियोजन यावर स्वरूपात चर्चा केले. यावेळी बळीराजा पतसंस्थेचे दामोदर देशमुख, शिक्षक पालक संघाचे आबासाहेब दैठणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य टीचर एज्युकेटर्स असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशम कोल्हे यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार यांनी मानले. 
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget