.
.
.

महाराष्ट्रातील आघाडीच्या सर्व जागांचा तिढा सुटला, लवकरच यादी जाहीर करू - शरद पवार

Pandharpur LIVE 13 March 2019


राज्यात जवळपास सर्वच जागांचा तिढा सुटला आहे. लवकरच संयुक्तरित्या या जागावरील उमेदवारही जाहीर होतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दिली.
मला अनेकांनी पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी विनंती केली. मी ऐकतो आणि एन्जॉय करतोय. आता मला थांबायला हवे कारण माझे वय ७९ आहे असे सूचक विधान निवडणूकीतील माघार याविषयावर बोलताना केले. अमित शहा यांनी 48 जागा म्हणायला हवे होते. त्यांनी चूक केली. त्यांनी 45 जागा म्हटले असा टोला अमित शहा यांना लगावला.
आम्ही कधीही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बोललो नाही. आम्हाला काही इंटरेस्ट नाही. त्यांची शक्ती असेलतर त्यांनी वेगळे लढावे.आमच्यासोबत आंबेडकर कधी होते असा सवाल पत्रकारांनाच त्यांनी केला. सुजय विखे पाटील ही मोठी राज्यस्तरावरची फिगर होती असे नाही. त्यांचा बालहट्ट पुरवण्याची जबाबदारी इतर पक्षाची नाही. माझ्या घरातील माझ्या मुलांचा हट्ट मी पुरवू शकतो, परंतु दुसर्‍याच्या घरातील मुलाचा हट्ट मी कसा पुर्ण करणार ते चांगलेही दिसणार नाही असा खोचक टोला शरद पवार यांनी पत्रकारांनी सुजय विखे पाटीलबद्दल विचारलेल्या प्रश्नाला देताना लगावला.

नोटाबंदीनंतर एक तर लहान उद्योग आणि नोकऱ्या गेल्या त्यामुळे त्याची किंमत भाजपाला मोजावी लागेल असा इशारा ही शरद पवार यांनी भाजपला दिला. मोदी तुम्हाला राजकीय गुरु मानतात असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर राजकीय निर्णयाचा विषय आल्यास मोदी कोणाचा सल्ला घेत नाहीत ते आपली 56 इंच छाती दाखवत असतात असे सूचक विधान शरद पवार यांनी केले.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
मोदी या निवडणुकीनंतर पंतप्रधान होतील असे मला वाटत नाही, असे सांगतानाच भाजप मोठा पक्ष होईल, मात्र भाजपाला सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल असेही शरद पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. भाजपाची ज्या राज्यात सत्ता होती, जिथे 10 वर्षे सत्ता होती त्याठिकाणी भाजपाची सत्ता गेली, देशातही तशी परिस्थिती येईल. त्यांना तशा जागा मिळणार नाहीत असेही शरद पवार म्हणाले.
दिंडोरीचा आग्रह धरू नका असे आम्ही सांगितले होते, त्याठिकाणी cpm ने तो आमचा निर्णय मानला असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. ज्याच्या त्याच्या कौटुंबिक आणि पक्षीय संस्कारांनुसार ते वक्तव्य करत असतात, त्याकडे लोक आणि आपणही लक्ष देवू नये असेही शरद पवार म्हणाले.
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येवून काम करत आहोत. आम्हाला शेकाप मदत करत आहे.जोगेंद्र कवाडेही आम्हाला सहकार्य करत आहेत. हे सर्व एकत्रित काम करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासोबत सकारात्मक आमची चर्चा झाली आहे. काँग्रेसची चर्चा झाल्यानंतर आमची एकत्रित चर्चा होईल असेही शरद पवार यांनी सांगितले.
14 तारखेला चंद्राबाबू नायडू आणि इतर पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक आहे. त्यात देशस्तरावर कसे लढायचे याबाबतचा अजेंडा एकच असावा असा आमचा प्रयत्न असणार आहे असेही सांगितले.


Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget