.
.
.

अनवली,आंबे व मुंढेवाडीमध्ये स्वेरीकडून ग्राम व्हिजीट संपन्न

Pandharpur LIVE 24 March 2019

 

स्वेरीच्या सिव्हील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम
पंढरपूर- ‘तंत्रशिक्षणाचा वापर ग्रामीण भागांसाठी करण्याकरीता नुकताच स्वेरीच्या सिव्हील इंजिनिअरिंग  विभागातील शिक्षक व विद्यार्थी यांनी अनवली, आंबे व मुंढेवाडी या तीन गावामध्ये दि. १९ मार्च रोजी ग्राम व्हिजीट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘समाजासाठी तंत्रशिक्षणाचा वापर’ या स्वेरीच्या धोरणाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना समाजाशी बांधिलकी वाढवून त्यांचे प्रश्न तंत्रज्ञानाद्वारे कसे सोडविता येतील? हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्धेश होता.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.
        या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी गावामध्ये जावून गावातील विविध प्रश्न समजून घेणे विविध विषयावर शास्त्रोक्त पद्धतीने गावातील नागरिकाना व शालेय विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणे तसेच स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमात शिकलेल्या काही तंत्रज्ञानाचा वापर गाव सुधारणेसाठी करणे, आदी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. अशी माहिती विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांनी दिली.त्या दिवशी विद्यार्थ्यांनी सकाळी सात वाजता प्रवास सुरु करून सकाळी प्रथम तिन्ही गावामध्ये जनजागृतीचे कार्यक्रम केले. यामध्ये स्वच्छतेचे महत्व, पिण्याच्या शुद्ध पाण्याचे महत्व, सांडपाण्याचे सुनियोजन, मुलींच्या शिक्षणाचे विशेषतः उच्च शिक्षणाचे महत्व इत्यादी मुद्द्यावर भर देण्यात आला. त्यानंतर स्वेरीमध्ये संशोधन करून तयार करण्यात आलेल्या व बी.ए.आर.सी.च्या तंत्रज्ञानावर आधारित ग्रामीण व समाजोपयोगी तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यामध्ये बी बियाणे, जलशुद्धीकरण यंत्र, मातीपरीक्षण यंत्र इत्यादी तंत्रज्ञानांची माहिती दिली. या सर्व कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. तसेच ग्रामस्थांनी या नवीन कार्यक्रमाचे कौतुक केले. आंबे गावामध्ये स्वेरीच्या विद्यार्थीनींनी गावातील मुलींना स्वरक्षणाचे धडे प्रात्यक्षिकातून दाखविले. दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी तिन्ही गावाचा सिव्हील इंजिनिअरिंगच्या सर्वेक्षण प्रणालीतून सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचा वापर करून विद्यार्थी त्या गावासाठी लागणारी पाणी पुरवठा योजना, सांडपाणी सुनियोजन योजना याची शास्त्रोक्त पद्धतीने डिझाईन बनवतील. या उपक्रमामुळे स्वेरीच्या विद्यार्थ्याना शिकत असतानाच एखादी योजना संपूर्णपणे कशी राबवावी याचे प्रात्यक्षिक देखील मिळाले. या तिन्ही गावामध्ये हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यास मदत केल्याबद्धल अनवली गावचे उपसरपंच सौ. सुनिता महादेव सुर्यवंशी, आंबे गावातील सरपंच सौ सुमन अर्जुन कोळी, उपसरपंच आण्णा शिंदे, मुंढेवाडीचे सरपंच सौ. उज्वला अशोक घाडगे व उपसरपंच धोंडीराम श्रीमंत मोरे तसेच तिन्ही गावातील ग्रामसेवक व ग्रामस्थ यांचे आभार महाविद्यालयाने मानले. 

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget