.
.
.

भीमा नदीकाठचा विद्युतपुरवठा सुरु करावा-गणेेश अंकुशराव

Pandharpur LIVE 29 March 2019


पंढरपूर (प्रतिनिधी):- उजनी धरणातुन भीमा नदीला पाणी सोडण्यात आले आहे; परंतु हे पाणी सोलापूरच्या औज बंधार्‍यात पोहोचेपर्यंत भीमा नदीकाठचा विद्युत पुरवठा खंडीत केला केला आहे. भीमा नदी भरुन वाहत असुनही विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे पशु-प्राण्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही. शेतकर्‍यांचे पशुधन यामुळे धोक्यात आले आहे. तरी किमान शेतकर्‍यांच्या गुराढोरांना तरी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी भीमा नदीकाठचा बंद केलेला विद्युत पुरवठा दिवसातुन किमान चार तास तरी सुरु करावा. या मागणीचे निवेदन महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयात व महावितरण पंढरपूरचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी नंदकुमार सोनंदकर यांना दिले आहे.


भीमा नदीकाठचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे इलेक्ट्रीक मोटारी बंद आहेत. यामुळे शेतकर्‍यांच्या पशुधनासाठी मिळणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. गुराढोरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न अधिक गंभीर बनला आहे. आधीच चारा महाग झाल्याने अव्वाच्या सव्वा रक्कम मोजुन आपले पशुधन वाचवण्यासाठी शेतकरी वर्ग धडपड करताना आढळत आहे. त्यात आता जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही समोर आ वासुन उभा ठाकला आहे.


लवकरात लवकर भीमा नदीकाठचा बंद केलेला विद्युत पुरवठा सुरु करावा अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल. असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देताना गणेश अंकुशराव, संतोष कांबळे, गुलशन सावंत, महेश कांबळे, मोहन बुधवले, धनाजी सर्जे, सोनबा सावंत, पोपट चव्हाण, लखन जाधव, वैभव कांबळे, अक्षय कोळी आदींसह महर्षी वाल्मिकी संघाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.  


खालील लिंकला क्लीक करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा Pandharpur Live  चे अन्ड्रॉईड अ‍ॅप्लीकेशन.  https://play.google.com/store/apps/details 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 

कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर 

Mail-livepandharpur@gmail.com 


Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget