.
.
.

डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांची भाजपाकडून सोलापूर लोकसभेसाठीची उमेदवारी निश्चित.. सुत्रांची माहिती

Pandharpur LIVE 22 March 2019


गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांना सोलापूर लोकसभेसाठी भाजपतर्फे उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवाचार्य महाराजांच्या जातीचे प्रमाणपत्र, प्रचाराची रणनीती, महाराज मंडळींचे सहकार्य यासंबंधाने भाजपने आधी चाचपणी केली. शिवाय शिवाचार्य महाराजांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पुढाकारही घेतला. तसेच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी महास्वामींबरोबर यासंदर्भात चर्चा केली.

डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महारांजांचे मन वळवण्यासाठी मैंदर्गीचे श्री. ष. ब्र. नीलकंठ शिवाचार्य महास्वामी, नागणसूरचे मठाधिपती श्री. ष. ब्र. रेणुक शिवाचार्य आदींनीही पुढाकार घेतल्याची माहिती आहे. सोलापूर लोकसभा लढण्यासंबंधीची बैठक, जिल्हा व सीमावर्ती भागातील महास्वामींशी झालेली चर्चा, मुंबईच्या मुख्यमंत्री कार्यालयातून हलविण्यात आलेली सुत्रे तसेच मुंबई येथे भाजप नेत्यांबरोबर झालेला कार्यक्रम आणि सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला लावलेली उपस्थिती यावरुन गौडगाव मठाचे मठाधिपती डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज लोकसभेच्या रिंगणात उतरणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget