.
.
.

पडघम निवडणुकांचे: काँग्रेस आय चे उमेदवार सुशिलकुमार शिंदे यांनी पंढरीतून फुंकले रणशिंग.... शरद पवार इज द नॅच्युरल लिडर ऑफ द कंट्री- सुशीलकुमार शिंदे

Pandharpur LIVE 24 March 2019

 माजी केंद्रीय मंत्री, सोलापूर लोकसभेसाठीचे काँग्रेस आय चे उमेदवार सुशिलकुमार शिंदे यांनी आज पंढरीतून निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून पंढरीतील ह.भ.प.तनपुरे महाराज मठामध्ये आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी काँग्रेस व मित्रपक्ष राष्ट्रवादी व इतर घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपाच्या राज्यकारभारावर कडाडून टीका केली.  शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना माढ्यातून कांही अडचणी निर्माण केल्या असतील व त्यांना कांही तरी खटकले असेल म्हणून त्यांनी माढ्यातून माघार घेतली असेल. त्यांच्या माढ्यातील माघारीमुळे काहीही फरक पडणार नाही.  ‘ही इज द नॅच्युरल लिडर ऑफ द कंट्री’ असे मत माजी सुशीलकुमार शिंदे यांनी पंढरीत पत्रकारांशी सुसंवाद साधताना व्यक्त केलंय.


या मेळाव्यास पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके, विधान परिषदेचे आमदार रामहरी रुपनवर, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक चेतन नरोटे, अमोल बंगाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश शामराव पाटील, राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे, माजी जिप अध्यक्षा जयमाला गायकवाड, राजूबापू पाटील, युवराज पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे, साधनाताई उगले, अशोक डोळ, सुहास भाळवणकर, अ‍ॅड.राजेश भादुले, अमर सुर्यवंशी, साधना राऊत, जोगेंद्र कवाडेगटाचे तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव आदींसह काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये श्री.शिंदे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना उत्तरे देताना भाजपावर निशाना साधला.

 पत्रकार परिषदेवर दृष्टीक्षेप:-
वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. आंबेडकर यांच्याशी युती न झाल्याचे कारण सांगताना ते म्हणाले की, केवळ 24 सीट असताना त्यांना 22 सीट हव्यात असा हट्ट त्यांनी धरला होता, मग आम्ही काय दोन जागेवरच समाधान मानावं का? 

वंचित बहुजन आघाडी व भाजपाने निर्माण केलेल्या आव्हाहनाबाबत बोलताना ते म्हणाले की, लढाईत उतरलोय आणि लढाई करत असताना आव्हाहनं झेलायची असतात आणि त्या आव्हाहनांना खतम करायचं असत. 

वंचित बहुजन आघाडीसंदर्भात पुढे बोलताना ते म्हणाले की,  माझी स्पष्ट भुमिका आहे की, धर्माच्या नावावर  ते लढाई लढत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जी सेक्युलर घटना लिहीली त्या घटनेचा खुन होतोय. डॉ.बाबासाहेबांच्या त्यागातून जी घटना घडली, जी घटना लिहिण्याकरता 3 वर्ष लागली, ज्या घटनेच्या माध्यमातून आज आपला देश चांगल्या पध्दतीने जातोय त्याला बाधा आणण्याचं काम होतंय. एमआयएम आणि वंचीत बहुजन आघाडीची जिथं युती झाली याचाच अर्थ घटनेला बाधा आणण्याचं काम त्यांच्याकडून होतंय. 
मोदींनी मिडीया विकत घेतलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

फायदा आणि तोटा निवडणुकीमध्ये आम्ही बघत नाही, जनता हुशार झाली आहे. तरुण पिढीमध्ये भावी नेतृत्व आहे, त्यांनी वरवरच्या वक्तव्याला भुलू नये, तरुणांच्या हातामध्ये संपुर्ण देश जायचा आहे. तरुण वर्गाला त्यांनी विनंती केली की, आपण व्यक्त होताना देशाला स्वातंत्र्य कुणी मिळवून दिलं, देशाची डेव्हलपमेंट कुणी केली याचा विचार करावा, कारण तरुण मंडळी गेल्या 25 वर्षाचाच विचार करतात, 25 वर्षापुर्वी काय घडलं हे त्यांना माहिती नाहीय. त्यामुळे तरुणांनी सर्व डिटेल्स माहिती घ्यावी अशी विनंती त्यांनी तरुण पिढीला केली. 

''एकदा एखादी कमिटमेंट केल्यानंतर ती पुर्ण केली पाहिजे या मताचा मी आहे. सर्व धर्मांना समान मानुन सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा काँग्रेस हा पक्ष आहे. आणि आमचा विजय निश्‍चित आहे. असा विश्‍वास त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.''

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget