.
.
.

पंढरपूर- मुकबधीर शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींवर शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार... ५ महिन्यांपासून तोंड काळे करुन घेणारे चार नराधम शिक्षक गजाआडपंढरपूर येथील निवासी मुकबधीर शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींवर शाळेतीलच चार नराधम शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार घडल्याची लाजिरवाणी घटना उघडकीस आली आहे.  सदर चार शिक्षकांनी शाळेतील चार अल्पवयीन विद्यार्थिनींवर आॅक्टोबर २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत लैंगिक अत्याचार केले असल्याचा माणुसकीला व शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा प्रकार निर्भया पथकाने उघडकीस आणला आहे.

ज्ञानोबा मल्हारी मस्के, अर्जुन तुकाराम सातपुते, संतोष बाळासाहेब कुलाल, सिध्देश्वर शंकर वाघमोडे अशी अत्याचार करणाऱ्या चार नराधम शिक्षकांची नावे असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

पंढरपूर शहर पोलिस ठाण्यातील निर्भया पथकाचे पोलिस उपनिरीक्षक गजानन गजभारे यांच्या पथकाने मुकबधीर शाळेची अचानक तपासणी केली. महिला पोलिस कॉन्स्टेबल शबाना मणेरी यांनी मुलींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पिडीत अल्पवयीन मुलींनी गेल्या पाच महिन्यांपासून शाळेतील हे चार शिक्षक आमच्यावर लैंगिक अत्याचार करीत असल्याचे सांगितले. त्यावरून पोलीस काॅन्स्टेबल शबाना मणेरी यांनी फिर्याद दिली. या चार नराधम शिक्षकांवर पोस्को अॅक्ट व ३५४ (अ), ३५४ (ब) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी ही घटना संतापजनक व निंदनीय असून निर्भया पथकाने हे दुष्कृत्य उघडकीस आणल्याबद्दल निर्भया पथकाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, जि. सोलापूर 413304मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  उपसंपादक - विजयकुमार गायकवाड Whats Up -  8308838111, 7083980165 Mobile- 7972287368Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget