सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ उद्या पंढरीत भव्य पदयात्रा आणि जाहीर सभा


पंढरपूर (प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ पंढरीत शुक्रवार दिनांक  12 एप्रिल रोजी पदयात्रा आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 
           


पंढरीत होणाऱ्या या पदयात्रेसाठी आणि  मातंग समाजाच्या मेळाव्यास स्वतः उमेदवार सुशीलकुमार शिंदे, आ. भारत भालके, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील आ. रामहरी रुपनर शहराध्यक्ष अँड. राजेश भादुले, राष्ट्रवादीचे राजूबापू पाटील, युवराज पाटील मनसेचे दिलीप धोत्रे आणि रुक्मिणी उद्योगसमूहाच्या सौ सुनेत्रा पवार आधी नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. ही पदयात्रा पंढरपूर शहरातील शिवाजी चौक येथून भादुले चौक, नाथ चौक, भजनदास चौक महाद्वार चौक, कालिकादेवी चौक, रोहिदास चौक, महात्मा फुले चौक, अण्णाभाऊ साठे चौक, सावरकर चौक, इंदिरा गांधी चौक, अर्बन बॅंक ते पुन्हा शिवाजी चौक या मार्गावरून निघणार आहे शुक्रवार दिनांक  12 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता ही पदयात्रा सुरू होणार आहे.  
या पदयात्रेस साठी कॉंग्रेस राष्ट्रवादी पक्षाकडून जोरदार तयारी केली गेली आहे. या पदापर्यंत कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे दुपारी 3 ते सायंकाळी  7 वाजेपर्यंत पंढरपुरात विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिकांची येथील टिळक स्मारक मंदिर मध्ये संपर्क साधणार आहेत. सायंकाळी सात वाजता मा. सुशिल कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र मातंग समाजाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास सोलापूर  आणि माढा लोकसभा मतदार संघातील मातंग समाजाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. शहरातील शिवाजी चौकातील शिवतीर्थावर होणारी ही सभा जंगी बनवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे तसेच राष्ट्रवादी आणि मातंग आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी केल्याचे दिसत आहे.


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget