.
.
.

विहीरीत आढळले महिलेचे प्रेत... खुन की आत्महत्या याचे गुढ .... पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील घटना


तिसंगी (प्रतिनिधी)-  पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील मोहन रजपूत यांच्या विहिरीमध्ये काल दि. ३ एप्रिल रोजी दुपारी १ ते २ च्या दरम्यान अंदाजे  ४५ ते ५० वयोमान असलेल्या अज्ञात महिलेचे प्रेत आढळून आले. गावच्या पोलिस पाटलांनी ही घटना पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

काल दुपारी ५ ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास सदर महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. सदर महिलेच्या अंगावरील स्टोनमध्ये (रुमाल) २० रु. च्या ४ नोटा, १० रु.ची १ नोट व ५ रू. चे १ नाणे असे एकूण ९५ रूपये आढळून आले आहेत. साधारण ४ ते ५ दिवसांपूर्वी ही महिला विहीरीत बुडली असावी. अधिक तपास पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे एएसआय आटपाडकर हे करत आहेत.

या महिलेने आत्महत्या केली की तिचा खुन झाला याबाबतचे गुढ कायम आहे.

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 
तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 
पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
 इफेक्ट बघा..! 
कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, 
                 पंढरपूर, जि. सोलापूर 413304
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 
Whats Up -  8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368
Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget