.
.
.

पळशीमध्ये ग्रामदैवत ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा संपन्न


 पळशीच्या ज्योतिर्लिंग यात्रे निमित्ताने आयोजिलेल्या कुस्ती स्पर्धेत एक विशेष कुस्ती लावताना पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे व.पो.नि. राजेश गवळी

पंढरपूर - पळशी (ता.पंढरपूर) गावचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य अशा कुस्ती स्पर्धाभेदीक व पोवाडे गायन अखंड हरिनाम सप्ताह या आणि अशा अनेकविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
           पळशीमध्ये ज्योतिर्लिंग यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हातील विविध ठिकाणच्या मल्लांनी हजेरी लावली. २५ वर्षाहून अधिक वर्षांची कुस्ती फडची परंपरा असणाऱ्या या कुस्ती स्पर्धांमध्ये रुपये १०० पासून ते ५१हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या लावण्यात आल्या. या कुस्ती स्पर्धेमधील सर्वांचे आकर्षण ठरलेली कुस्ती म्हणजे रुपये ५१००० ची अंतिम कुस्ती. पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या हस्ते ही कुस्ती पै. उमेश चव्हाण खवासपूर तालीम विरुद्ध पै. श्रीनिवास मसुगडे शिवनेरी तालीम अकलूज या दोन मल्लामध्ये लावण्यात आली. यामध्ये पै. उमेश चव्हाण खवासपूर तालीम यांचा मल्ल विजयी झाला. त्याने श्रीनिवास मसुगडे यास एक चाक डावावर चितपट केले तर स्पर्धेमधील २१००० हजार रुपयांची दुसरी कुस्ती पै. महेंद्र गायकवाड शिरशी तालीम विरुद्ध पै. भैया खरात खुडूस तालीम या दोन मल्लांमध्ये रंगली. यात पै. महेंद्र गायकवाड याने घुटना डावावरती पै. भैया खरात यास अस्मान दाखवले. स्पर्धेमधील तिसरी मोठी इनामी कुस्ती रुपये ११००० हजारांसाठी पै. अक्षय बोडरे निमगाव विरुद्ध पै. महेश आटकळे पंढरपूर तालीम या दोन मल्लांमध्ये रंगली. सुमारे अर्ध्या तासाहून अधिक वेळ चाललेल्या या कुस्ती मध्ये दोन्ही मल्लांनी तोडीस तोड टक्कर दिली. अखेर दोन्ही मल्लांपैकी एकही मल्ल मागे हटण्यास तयार नसल्याने अखेर पंचांना ही कुस्ती बरोबरीत सोडवावी लागली. २०० हुन अधिक मल्लांनी सहभाग नोंदवलेल्या या कुस्ती स्पर्धांमध्ये १०० हुन अधिक कुस्त्या लावण्यात. त्यासाठी दीड लाखाहून अधिक रकमेची बक्षिसे देण्यात आली. संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून पै. मारुती झांबरेसुरेश झांबरे यांनी काम पाहिले.या कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित असलेले पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे व.पो.नि. गवळी यांचे पळशी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले. त्यांच्या समवेत आलेले सहकारी पो. कॉ.बालाजी कदमश्रीराम ताटेप्रवीण सावंतनितीन चवरे,नितीन डाकवाले या सर्वांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ग्रामस्थां प्रा. सोमनाथ झांबरेप्रा. परमेश्वर झांबरेमाजी सरपंच रघुनाथ झांबरेसचिन झांबरेनवनाथ झांबरेतानाजी झांबरेसागर झांबरेसत्यवान झांबरेसिद्धेश्वर झांबरे,सुरेश झांबरे आदी उपस्थित होते. ही यात्रा सात दिवस चालणार असून यामध्ये अखंड हरीनाम साप्ताह मध्ये जेष्ठ नागरिक व वारकरी सांप्रदायातील नागरिक उपस्थित आहेत.

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget