.
.
.

सिंहगड मध्ये २४ तासाच्या मेहनतीने समाज उपयोगी सॉफ्टवेअरची निर्मिती


पंढरपूर सिंहगड मध्ये "सिंहगड हॅकॅथाॅन-२०१९" स्पर्धा उत्साहात
पंढरपूर (प्रतिनिधी) भारत सरकारच्या नियमाप्रमाणे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पंढरपूर महाविद्यालयात सिंहगड हक्कातून २०१९ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन या परिषदेचे उदघाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीससंस्थेचे सहसचिव संजय नवलेसिंहगड इन्स्टिट्युट पुणे येथील संचालिका डॉ. आशा बोकीलप्राचार्य डॉ. कैलाश करांडे या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
       या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सलग २४ तास प्रोग्रॅम करून ४८ विद्यार्थ्यांनी समाज उपयोगी सॉफ्टवेअर बनवले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून १२ संघ म्हणजेच एकूण ४८ विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ट्वीविंग्ज सॉफ्ट कंपनीचे डायरेक्टर तुषार वाघमारे व त्यांची टीम यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे समन्वयक प्रा. वीरेंद्र धोत्रे सह विद्यार्थी प्रतिनिधी कु. रणजीत कलुबर्मे  यांनी काम पाहिले. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी  विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी २४ तास उपस्थित राहून वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मदत केली.
    यास्पर्धेमध्ये एक तास योगा घेण्यात आला. स्पर्धेचे प्रायोजक देशातील नामवंत कंपन्या ट्वीविंग्ज सॉफ्ट सोल्युशन पुणे सिमेंन्स व एडीफिको दिल्ली हे होते. स्पर्धेतील प्रथम बक्षीस ११०००  रुपये तर द्वितिय बक्षीस ७००० रुपये रोख रक्कम व सन्मानचिन्ह हे विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना देण्यात आले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. नामदेव सावंत, प्रा. स्वप्निल टाकळे सह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी सह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी   अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सोमनाथ ठिगळे यांनी केले.

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget