.
.
.

मिरज-सोलापूर एक्सप्रेसची वेळ बदलण्याच्या मागणीने जोर धरला


Sangola - (प्रतिनिधी )- मिरज सोलापूर एक्सप्रेस मिरजेतून 4 वाजता सुटते व पंढरपूरला 6.30 ला येते व पंढरपूर मुंबई फास्ट पॅसेंजर आठवड्यातून 3 दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार व रविवार सायंकाळी 5.15   ला सुटते मात्र ही ट्रेन सकाळी 10 वाजता स्टेशनवर येऊन थांबलेली असते तर मिरज सोलापूर एक्सप्रेस 2 वाजता प्लॅटफॉर्मवर उभी असते या दोन्हीपैकी एकाचीजरी वेळ बदलली तरी मिरज सोलापूर ट्रेन व पंढरपूर मुंबई  फास्ट पॅसेंजर सोईची होऊ शकते ढालगाव, कवठेमहांकाळ, जवळा, सांगोला, कोळे, घेरडी, कडलास यांसारख्या अनेक गावांना मुंबईला थेट जाता  येईल. 

सध्या सांगोल्यातून मुंबईला दररोज जवळपास 10 ते 12 लक्झरी, 5 ते 6 एसटी बस म्हणजे जवळपास रोज 400 ते 500 पॅसेंजर मुंबईला जातात पूर्वी मिरज मुंबई अशी कुर्डुवाडी मार्गे चालू केली होती त्यास प्रतिसादही चांगला मिळाला होता तरीही ती बंद करण्यात आली होती. मिरज सोलापूर एक्सप्रेस तरी लवकर सोडावी अथवा पंढरपूर मुंबई फास्ट पॅसेंजर उशिरा सोडावी मात्र आठवड्यातील 3 दिवस तरी रेल्वे प्रशासनाने प्रवाश्याच्या सोयीचा विचार करावा अन्यथा 3 दिवस सकाळी 10 वाजता येणारी मुंबई पंढरपूर पॅसेंजर विश्रांती घेऊन ढालगाव पर्यंत नेऊन परत फिरवावी जेणेकरून या भागातील सर्व प्रवाश्यांना त्याचा पुष्कळ लाभ होईल नाहीतर ही ट्रेन पंढरपूर स्टेशनवर सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत उभी असते.


दिवसा चांगला प्रतिसाद असणारी सोलापूर कोल्हापूर एक्सप्रेस रात्री केली, सायंकाळी मिरजेतून निघणारी मिरज पंढरपूर या पॅसेंजर ट्रेनला सुपरफास्ट नाव देऊन तिकीट वाढविले, मिरज सोलापूर पॅसेंजर होती ती बदलून एक्सप्रेस केली मात्र प्रवासात फारसा फरक पडला नाही तिकीट मात्र वाढले, सोलापूर कोल्हापूर आणि कोल्हापूर सोलापूर या दोन्ही एक्सप्रेस रात्री केल्या आणि त्या मध्यरात्री येत असल्यामुळे याच्या मधल्या गावांना काहीच फायदा नाही, सायंकाळी सोलापूरहून म्हणजेच जिल्ह्याच्या ठिकाणाहून पंढरपूर सांगोला या गावांना परतीसाठी ट्रेन नाही, सोलापूर गोवा थेट ट्रेन अथवा मिरज येथून रात्री 10.30 वाजता नियमित जाणाऱ्या गोवा एक्सप्रेसला जोडणारी ट्रेन सोलापुरातून असायला हवी.

 सांगोल्यातील शहिद अशोक कामटे रेल्वे प्रवाशी संघटनेचा याविषयी अखंड पाठपुरावा चालू असून संघटनेच्या वतीने अध्यक्ष निलकंठ शिंदे सर म्हणाले की, आमचा शेवटपर्यंत पाठपुरावा चालूच राहणार आहे संघटनेच्या वतीने विजयसिंह मोहिते पाटील   ,विभागीय रेल्वे व्यस्थापकः ,सोलापूर निवेदन देऊन पाठपुरावा चालू आहे.


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, जि. सोलापूर 413304मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  उपसंपादक - विजयकुमार गायकवाड Whats Up -  8308838111, 7083980165 Mobile- 7972287368Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget