.
.
.

स्वेरीच्या डिप्लोमा कॉलेजच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या ‘अँड्रॉइड अॅप’वर बक्षिसांचा वर्षावपंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर)श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या पदवी व पदविकेच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या विविध प्रकारच्या बंदोबस्तासाठी बनविलेल्या ‘अँड्रॉइड अॅप’ला पुणे येथील एस.के. एन. सिंहगड महाविद्यालयात झालेल्या आठव्या राष्ट्रीय कॉनव्हेन या प्रोजेक्ट एक्झीबीशनमध्ये तृतीय क्रमांकाचे रु. दहा हजाराचे पारितोषक व सन्मान चिन्ह तर कोर्टी (ता. पंढरपूर) मधील एस.के. एन. महाविद्यालयात झालेल्या ‘हॅकेथॉन’ स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषक मिळालेआहे. यापूर्वी याच ‘अँड्रॉइड अॅप’ला संजय घोडावत पॉलिटेक्निक कॉलेजअतीग्रे,कोल्हापूर येथे आयोजिलेल्या स्पर्धेत देखील राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषक मिळाले होते. आजपर्यंत या ‘अँड्रॉइड अॅप’ला अशी एकूण आठ पारितोषके मिळाली असून याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
             सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची प्रायोजकता असलेल्या पोलीस दलाचे ‘अँड्रॉइड अॅप’ हे स्वेरी अंतर्गत असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या डिग्रीचे विद्यार्थी व डिप्लोमा कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी तयार केले असून या ‘अॅप’च्या माध्यमातून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वारी बंदोबस्त व इतर सर्व प्रकारचे बंदोबस्त या अॅपच्या माध्यमाने अत्यंत सुलभ पद्धतीने पार पाडता येत आहेत. याची पहिली चाचणी २४ डिसेंबर रोजी झालेल्या व्ही.आय.पी.बंदोबस्ता दरम्यान घेण्यात आली तर या ‘अॅप’ची दुसरी यशस्वी चाचणी माघी वारी पोलीस बंदोबस्ताच्या वेळी घेण्यात आली. या ‘अॅप’च्या माध्यमातून पोलीस बंदोबस्तामधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या कर्तव्याचे ठिकाण अगदी सहजतेने पाहता येते शिवाय बंदोबस्ताविषयीच्या संबंधित अनेक बाबी अधिकारी व कर्मचारी वर्गाला समजतात शिवाय त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांची हजेरी क्यु.आर.कोड वर आधारीत ओळख पत्राच्या माध्यमातून लावता येते. कर्मचाऱ्यांना या सॉफ्टवेअरद्वारे आपली हजेरीटीममहत्वाच्या सूचनात्यांचे बंदोबस्त अधिकारी व अशा अनेक गोष्टी सहज पाहता येतात. या अनुषंगाने सोलापूर (ग्रामीण) पोलीस दलाने स्वेरी कॉलेजच्या माध्यमाने जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना क्यु.आर.कोड आधारित जवळपास दोनहजार सातशे  पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दिलेले आहेत. हे ‘अॅप’तयार करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मनोज पाटीलउपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे आणि पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी मार्गदर्शन केले. हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रा. सोमनाथ झांबरेप्रा. अवधूत भिसेप्रा. अमेय भातलवंडे, प्रा. प्रशांत भंडारे व प्रा. अश्विनी पालकर यांच्या सहकार्याने डिप्लोमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे रोहित कोंडे, धवल द्यावनपल्ली, सिद्धेश खडकेतेजस पाटीलऋषिकेश कोरडेयशराज चव्हाणप्रज्वल बेंडाळे,अभिषेक वरपे, अथर्व रुपलग, हर्षद कमले, सोहेल मुलाणी, ओंकार माळी, अक्षय मलपे या विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट पूर्ण केला. या ‘अँड्रॉइड अॅप’ला पुणे येथील एस.के. एन. सिंहगड महाविद्यालयात पार पडलेल्या  स्पर्धेत रु. दहा हजाराचे तृतीय क्रमांकाचे पारितोषक तेथील प्रमुख पाहुणे विकास चौधरी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले तर कोर्टी (ता. पंढरपूर) मधील एस.के. एन. महाविद्यालयात दि. २९ व ३० मार्च रोजी पार पडलेल्या ‘हॅकेथॉन’ स्पर्धेत देखील तृतीय क्रमांकाचे पारितोषक पटकावून स्वेरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. या अगोदर याच ‘अॅप’साठी पुणेसोलापूरकोल्हापूर या जिल्ह्यातील इतर कॉलेजमध्ये घेण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट एक्झीबीशन’ मध्ये तब्बल आठ वेळा विविध ठिकाणी पारितोषिकांचा वर्षाव झाला असून आत्तापर्यंत यासाठी एकूण ब्याऐंशी हजार रुपयांची रोख पारितोषके मिळाली आहेत. प्रोजेक्ट टिममधील विजेत्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा, संस्थेचे पदाधिकारी व सर्व विश्वस्त, डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, कॅम्पस इनचार्ज प्रा. एम. एम. पवार, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, जि. सोलापूर 413304मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  उपसंपादक - विजयकुमार गायकवाड Whats Up -  8308838111, 7083980165 Mobile- 7972287368Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget