.
.
.

लग्न नसताना राज ठाकरे नेमकं कुणासाठी नाचतात, प्रकाश आंबेडकरांची टीका


मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेऊन भाजपवर टीका करत आहेत. मात्र, लग्न नसताना राज ठाकरे नेमकं कुणासाठी नाचतात, अशी खोचक टीका वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेकडर यांनी अहमदनगर येथे केली आहे.



मनसेने लोकसभेमध्ये उमेदवार दिले नाही, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना राजकीय क्षितीजावरून हद्दपार करण्याचे आवाहन राज ठाकरे सभांमधून करत आहेत. भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची परिस्थिती डबघाईस आली आहे. त्यामुळे या मंडळींना पुन्हा सत्ता देऊ नका असा, जोरदार प्रचार राज करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच राज यांनी मी काय प्रकाश आंबेडकर आहे का दोन देता का? तीन देता का? अशी खिल्ली उडवली होती. त्यानंतर आंबेडकरांकडून कोणतेही उत्तर आले नव्हते. राज यांच्यावर भाजपातर्फेही जोरदार टीका करण्यात येत आहेत. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांची फैरी सुरु झाल्या आहेत. मात्र आंबेडकरांच्या टीकेला राज काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget