.
.
.

प्रांजली गोसावी यांना उपचारासाठी स्वेरीकडून ६६ हजारांची मदत स्वेरीतून घडले माणुसकीचे दर्शन


पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थिनी प्रांजली गोसावी यांच्या उपचारार्थ स्वेरीतर्फे प्रांजलीच्या मातोश्री सौ. कविता मोहन गोसावी यांच्याकडे सहासष्ठ हजार रुपये सुपूर्त करताना डॉ. स्नेहा सुरज रोंगे सोबत वसुंधरा कृषीशास्त्र महाविद्यालयाचे डॉ.  संतोष थिटे,सोलापुर जिल्हा हिंदी अध्यापक संघाचे डॉ. शिराळ, पाहुणे डॉ. कदम, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, डिप्लोमा पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ व इतर.

पंढरपूर- प्रांजली हनुमंत गोसावी या स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (पॉलिटेक्निक)च्या माजी विद्यार्थीनीला उपचारासाठी गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटने एकूण सहासष्ठ हजार रुपयांची मदत केली. आज समाजात वावरताना सहसा ‘मदत’ नावाचा शब्द फक्त वाचण्यास मिळतो पण याठिकाणी स्वेरीने केलेली मदत पाहून ‘माणुसकी अजून जिवंत आहे’ याचाच प्रत्याय येतो आणि याचीच चर्चा सध्या पंढरपूर पंचक्रोशीत होत आहे.त्याचे झाले असे की, ब्रम्हपुरी (ता.मंगळवेढा) येथील प्रांजली हनुमंत गोसावी ह्या दहावीला ८६ टक्के गुण मिळवून येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनीअरींग (पॉलिटेक्निक)च्या सिव्हील विभागात सन २०१४-१५ मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतला. स्वेरी अंतर्गत असलेल्या मुलींच्या वसतिगृहातच राहून प्रथम वर्षात ७५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. पुढे पुण्यात नोकरीच्या निमित्ताने राहिल्यानंतर त्यांना गेल्याच वर्षी गंभीर अशा रक्ताच्या कर्करोगाने ग्रासले. पुढे पुण्यातीलच दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु केले. त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या स्नुषा डॉ. स्नेहा सुरज रोंगे यांच्या देखरेखेखाली प्रांजली ह्या माजी विद्यार्थिनी उपचार घेत असल्याचे समजले. हीच बाब स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्यापर्यंत पोचली. 


प्रांजलीच्या घरची हलाकीची परिस्थिती आणि त्यातून तिचे पिता एक शेतकरी त्यामुळे संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे आणि त्यांचे सहकारी साक्षात परमेश्वर बनून उभे राहिले. सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांचा शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्याचा ठसा सर्वत्र उमटत असतानाच प्रांजलीला मदत म्हणून तत्काळ त्यांनी स्वतःच्या खिशातून रोख पाच हजार रुपये काढून गोसावी यांच्याकडे उपचारार्थ दिले. हे पाहून स्वेरीचे विश्वस्त अमर जाधव, विश्वस्त अमर पाटील व विश्वस्त ए. एल. भोसले यांनी मिळून अकरा हजार रुपये तर स्वेरी संस्थेकडून पन्नास हजार रुपये असे मिळून एकूण सहासष्ठ हजार रुपयांची मदत प्रांजलीच्या मातोश्री सौ. कविता मोहन गोसावी यांच्याकडे डॉ. स्नेहा रोंगे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुपूर्त केले. यावेळी वसुंधरा कृषीशास्त्र महाविद्यालयाचे प्रमुख व रेशीम शेतीचे प्रचारक व प्रसारक डॉ.  संतोष थिटे, सोलापुर जिल्हा हिंदी अध्यापक संघाचे सहसचिव डॉ. शिराळ, विशेष पाहुणे डॉ. कदम,  शिवाजी रणदिवे, मधुकर जाधव, पांडुरंग देशमुख, शेळके, स्वेरीचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, डिप्लोमा पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळबी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, अभियांत्रिकीचे उपप्राचार्य डॉ. दिनकर यादव, सर्व अधिष्ठातासर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget