.
.
.

टंचाई निवारणार्थ तातडीच्या उपाययोजना राबवून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर


पुणे : यावर्षी पावसाच्या कमतरतेमुळे पुणे विभागात पाणी टंचाईचे तीव्र संकट निर्माण झाले आहे. या टंचाई निवारणार्थ तातडीच्या उपाययोजना राबवून सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.
                येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागातील टंचाई आढावा बैठक पार पडली. यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी प्रत्येक जिल्हा निहाय टंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला, त्यानंतर ते बोलत होते. यावेळी साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी  राजेंद्र भारूड, साताऱ्याचे कैलास शिंदे, कोल्हापूरचे अमन मित्तल, सांगलीचे प्रभारी विक्रांत बगाडे, उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
                डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, पावसाच्या कमतरतेमुळे यावर्षी पाण्याची मोठी समस्या आहे. या कालावधीत पुणे विभागातील 677 गावे व  4258 वाड्यावस्त्यांवरील 12 लाख 38 हजार 250 लोक बाधीत झाले आहेत. तर 3 लाख 72 हजार 844 पशुधन बाधीत आहे. ही संख्या खूपच मोठी असून 43 शासकीय व 761 खजगी अशा मिळून 804 टँकर्सच्या माध्यमातून पुणे विभागात पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 211 गावे तर 1410 वाड्या वस्त्या बाधीत आहेत. तर सातारा जिल्ह्यात 3 लाख 18 हजार 658 आणि सांगली जिल्ह्यातील 54 हजार 186 पशुधन बाधित आहे.
                पुणे विभागात टंचाईचा सामना करण्यासाठी नवीन विंधन विहिरी घेणे, नळपाणी योजनांची विशेष दुरूस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती करणे, नगरपालिका हद्दीतील प्रगतीपथावरील योजना शीघ्रगतीने पूर्ण करणे, तात्पुरर्त्या पुरक नळपाणी पुरवठा योजना करणे, विहिरी खोल करणे, त्यांच्यातील गाळ काढणे या उपायोजना करण्यात येत आहेत. टंचाईचा सामना करण्यासाठी या कामांना वेग देणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना, आणि त्यांच्या पशुधनाला दिलासा देण्यासाठी विशेष उपायोजना करण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.


आपत्तीच्यावेळी शासनाच्या सर्व यंत्रणांनी सतर्क राहून उपाययोजना कराव्यात
-    विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, अप्पर जिल्हाधिकारी यांची उपस्थिती
पुणे दि. 3 : विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी मान्सून पूर्व आढावा बैठकी घेवून संभावीत आपत्ती निवारणासाठी आपत्ती निवारण आराखडा तयार करावा. तसेच प्रत्येक विभागांनी आपली यंत्रणा सतर्क ठेवून आपत्ती कोसळल्यास पिडीतांना तातडीने मदत  पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.
                येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली. त्यावेळी  डॉ. म्हैसेकर बोलत होते. यावेळी साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी  राजेंद्र भारूड, साताऱ्याचे कैलास शिंदे, कोल्हापूरचे अमन  मित्तल, सांगलीचे प्रभारी विक्रांत बगाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता  एस. एस. साळुंखे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे, कोल्हापूरचे डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
                डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, येणाऱ्या मान्सूनच्यापूर्वी सर्व  विभागांनी आपल्या स्तरावर मान्सून पूर्व आढावा बैठकी घेवून संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी आपत्ती निवारण आराखडा तयार ठेवावा. प्रत्येक जिल्ह्यात चोवीस तास आपत्ती  निवारण कक्षाची स्थापना  करावी.  या कक्षात कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण द्यावे. विभागातील नदीच्या काठावरील सर्व गावे आणि शहरांनी आपल्या पूर रेषेची योग्य प्रकारे आखणी करावी. कोल्हापूर आणि सांगली या दोन शहरांना वारंवार पूराचा सामना करावा लागतो, या दोन्ही महानगरपालिकांनी विशेष दक्षता घ्यावी.


                पूरस्थितीचा सामना करण्या बरोबरच  या कालावधीत साथीचे आजार पसरणार नाहीत, याची काळजी घ्यावी. शहरातील नाला सफाई प्राधान्याने करून घ्यावी, तसेच सांडपाण्याचे मेन होल व्यवस्थित बंद करून घ्यावेत, तसेच सफाई कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात काम करण्यासाठी गमबूट, रेनकोट, हॅण्ड ग्लोज यांसारख्या सुरक्षेच्या साधनांचा पुरवठा करण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget