.
.
.

लोकसभा निवडणूक निकाल- २०१९ ... मोदी लाटेचं देशभरात धुमशान


भारतीय नागरिकांनी बजावलेल्या मतदानाच्या हक्काचा करिश्मा ठळकपणे दिसून येत असुन आज लोकसभा निवडणुकांच्या निकालांचे जसजसे अपडेटसअ समोर येत आहेत तसतसे भाजपा व मित्रपक्षाकडून स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी चा मार्ग सुकर झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. एकुणच देशभरात मोदी लाटेचं धुमशान पसरल्याचं सिध्द झालं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली असून केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ५४२ पैकी ५१६ जागांवरील सुरुवातीचे कल हाती आले आहेत. यात भाजपाप्रणित रालोआ २९८ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसप्रणित संपुआ – १०६, अन्य पक्ष – ११७ जागांवर आघाडीवर आहेत.

१७ व्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया ११ एप्रिल रोजी सुरू झाली आणि सात टप्प्यांमध्ये मतदान होऊन १९ मे रोजी संपली. यावेळी अपक्षांसह विविध पक्षांचे आठ हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून या सर्वांचे भवितव्य गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत निश्चित होईल. लोकसभा निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच मतपावती जोडलेल्या मतदान यंत्रांचा (व्हीव्हीपॅट) वापर करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही पाच मतदान केंद्रांमध्ये मतदानयंत्रे आणि मतपावत्या याआधारे मतपडताळणी केली जाणार आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मतपावती जोडलेल्या ३० मतदान यंत्रांची पडताळणी झाल्यानंतरच निवडणूक अधिकारी अधिकृत निकाल जाहीर करतील.


लाईव्ह अपडेट

 • 11:41 AM
  बारामतीत १२ व्या फेरीअखेर सुप्रिया सुळे यांनी मिळवलं ७० हजारांच्या वर मताधिक्य
 • 11:39 AM
  मुंबईतील सहाही मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजपच्या उमेदवारांची भरभक्कम आघाडी
 • 11:24 AM
  अमेठीत भाजपाच्या स्मृती इराणींनी पुन्हा राहुल गांधी यांना टाकलं मागे | स्मृती इराणींची ७६०० मतांनी आघाडी
 • 11:05 AM
  साताऱ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले १५७१९ मतांनी आघाडीवर
 • 11:02 AM
  रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत ३८०३३ मतांनी आघाडीवर
 • 11:01 AM
  बारामतीमधून नवव्या फेरीअखेर सुप्रिया सुळे यांना ९२७३ मतांची आघाडी 
 • 10:57 AM
  मावळमधून पार्थ पवार ८०३८९ मतांनी पिछाडीवर | पवार कुटुंबियांना धक्का | अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार पराभवाच्या छायेत
 • 10:52 AM
  सोलापूरमधून काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे आघाडीवर
 • 10:52 AM
  भाजपनं पार केला बहुमताचा आकडा | दहा वाजेपर्यंत भाजप+ ३३७, काँग्रेस+८३ तर इतर १२२ जागांवर आघाडीवर 
 • 10:51 AM
  सांगलीमधून भाजपाचे संजय काका पाटील १५७३६ मतांनी आघाडीवर
 • 10:51 AM
  भंडारा - गोंदियामधून भाजपचे सुनील मेंढे १७०९४ मतांनी आघाडीवर 
 • 10:51 AM
  नांदेडमधून भाजपाचे सुधाकर श्रृंगारे ११६३८ मतांनी आघाडीवर
 • 10:50 AM
  औरंगाबाद : हर्षवर्धन जाधव यांची ७०० मतांनी आघाडी | इम्तियाज जलील दुसऱ्या क्रमांकावर | चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर
 • 10:50 AM
  औरंगाबाद : हर्षवर्धन जाधव यांची ७०० मतांनी आघाडी | इम्तियाज जलील दुसऱ्या क्रमांकावर | चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर
 • 10:50 AM
  औरंगाबाद : हर्षवर्धन जाधव यांची ७०० मतांनी आघाडी | इम्तियाज जलील दुसऱ्या क्रमांकावर | चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर
 • 10:44 AM
  भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली, नरेंद्र मोदी संध्याकाळी साडेपाच वाजता कार्यकर्त्यांना भेटणार
 • 10:43 AM
  काँग्रेस यंदाही विरोधी पक्षनेतेपदाला मुकणार; २०१४ ची पुनरावृत्ती होणार?
 • 10:41 AM
  ठाणे लोकसभा मतदारसंघात सेनेच्या राजन विचारे यांना ५० हजार मतांची आघाडी  
 • 10:39 AM
  मुंबई : निकालाचे कल पाहता सकाळपासून मुंबईतील काँग्रेस कार्यालयामध्ये शांतता 
 • 10:36 AM
  मावळ मतदारसंघातून पार्थ पवार ७५ हजार मतांनी पिछाडीवर
 • 10:21 AM
  दिल्ली : भाजपा मुख्यालयात सुरुवातीचे कल पाहिल्यानंतर कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष | फटाके फोडले, ढोलाच्या तालावर धरला ताल
 • 10:19 AM
  अहमदनगर भाजपा उमेदवार सुजय विखे पाटील ३७११० मतांनी आघाडीवर | संग्राम जगताप दुसऱ्या क्रमांकावर 
 • 10:18 AM
  औरंगाबादमधून एमआयएम उमेदवारी इम्तियाज जलील १५,७५८ मतांनी आघाडीवर
 • 10:17 AM
  निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, भाजपा २७९ जागांवर आघाडीवर तर काँग्रेस ५१ जागांवर आघाडीवर

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget