साखर कामगार कै. मनोहरराव निळकंठ कुटे पाटील यांचे वर्षश्राध्दा निमित्ताने त्यांच्या स्मृतीस उजाळा


 मनोहर निळकंठ कुटे ,जन्म 1/6/1952 , नेवासा वडिल निळकंठराव गावची पाटीलकी पहात घडयाळ विक्री व रिपेअरीग व्यवसाय करत करत अशोक सह.साखर कारखाना श्रीरामपुरची निर्मिति झाल्याने,मिल फोरमैन म्हणुन कायर्रत आसल्याने मनोहरराव यांचे शिक्षण 12 वी सायन्स पर्यत शिक्षण श्रीरामपुर येथे बोरावके कॉलेज येथे झाले. त्याना तीन बन्धु , ज्ञानश्वर,विठल,चंद्रशेखर ,पत्नी शशिकला,मुलगा अविनाश, इंजीनिअर ,जावई बि. एन् हापसे -केमिस्ट असा परिवार आहे.

सुरूवाती पासुन त्यांची संशोधात्मक,कुठल्याही क्षेत्रात प्रयोगशील व समाजासाठी सतत काहीतरी  तांत्रिक दृष्टया करण्याची धडपड व जिद्द होती. त्यांना जुनी गाणी,पुस्तक वाचन व उच्च शिक्षणाची खुप आवड़ होती तसेच उच्च शिक्षीत व्यक्तीमत्वे त्यांना फार आवडते असे.एस. एस. सी. त ते तालुक्यात प्रथम आले होते.

आजोबा पासुन बाहेरगांवी राहिल्याने व पुढे सिलिंग कायदयाने जमीनी अल्प राहिल्या परिस्थिति अभावी त्यांचे तत्कालीन वेळी पदवी पर्यत शिक्षण होवु शकले नाही, कौटुबिंक जबादरी लवकरच अंगावर पडली,शिक्षण सोडुन लग्न करने त्यांना पसंत नव्हते,मंडपात बळजबरीने धरुन त्यांचे शुभमंगल पार करावे लागले त्यानंतरही त्यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही तत्कालीन वेळी पुणे विद्यापीठ  अंतर्गत बाहेरुन शिक्षण त्यांनी चालू ठेवले.

अशोक साखर श्रीरामपुर , वसंत साखर पुसद,कन्नड़ साखर औरंगाबाद,पूर्णा साखर परभणी व संत तुकाराम साखर पुणे येथे त्यांनी रसायन विभागात ज्यूस सुपरवायझर म्हनुन सर्वाशी सुसंगत कौशल्यपूर्वक कार्य केले सहकारी त्यांना कुटे आण्णा म्हणुन संबोधित असे यातच् त्यांचे मर्म साधले आहे.
या क्षेत्रात कायर्रत असताना देव पाहिला कुणी असे म्हणत ते आदरणीय सर्वश्री.माणिकराववजी जगधने श्रीरामपुर
डि. जी. हेर्लेकर, पूर्णा साखर परभणी
डी. एम. रासकर श्रीनाथ म्हस्कोबा शुगर पुणे
यांना आपल्या जीवनातील आदर्श व दैवत् मानत असे.

आपल्या परीवारातील मा.सर्वश्री. बोखारे साहेब, अनिलजी शेवाळे साहेब सुर्यवंशी साहेब,कुलकर्णी साहेब यांचेसह सेवेत कायर्रत आसल्याने त्यांचे कामकाजा विषयी त्यांना सविस्तर माहीती आहे.

सेवानीवृनंतर नंतर त्यांनी गांवी येवून आपली अल्पशेती विकसित करुन पर्यायी शेतात तत्कालीन वेळी विज उपलब्ध नसतांना देखील डिझेल जनरेटर ,ठिबक व स्पींकलरच्या सय्याने आधुनिक व प्रगत शेतीची कास् धरत पहिल्याच् वर्षी केवळ दिड एक्करत 3.5 लाखाचे उत्पन्न पहिल्याच् वर्षी घेतले. 

आपला साखर कामगार अल्प क्षेत्रामुळे अनेक वर्ष नोकरी निमित्य बाहेर गांवी राहतो म्हनुन अगदी अल्प क्षेत्रात केवळ 5/10 गुंठयात अतिशय अल्प पानी व जमिनीत स्व:ताला करता येईल अशी परवडेबल शेती व सेवानीवृर्ती नंतरचे सुखी जीवन यावर ते काम करीत असतानाच् अचानक त्यांना पॅरालेसीस होवुन काळाने घाव घातला. तीन वर्ष त्यांनी दुःखाशी झुंज़् देत अखेर दि.14/4/18 रोजी त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. शेवटी जातांना त्यांनी माझे कडुन शब्द घेतला की साखर कामगार व शेतकरी यांचेसाठी राजकरण विरहित सामाजिक कार्याच्या माध्यमातून चांगले काम केल्यास माझे आत्म्यास शांती लाभेल.
म्हणुन आपला परिवार व साखर विश्व प्रतिष्ठान च्या माध्यमातून काम सुरु केले आहे. आपले सदैव सहकार्य मिळत राहो. हिच सदिच्छा.

(शब्दांकन- अविनाश कुटे-पाटील)


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget