.
.
.

वारकरी किर्तनातून महाराष्ट्रातील दुष्काळी छावणींवर प्रबोधन ..!


महा एनजीओ फेडरेशन ( १५०० हुन अधिक सामाजिक सेवाभावी संस्थांचा समूह ) व वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र यांच्या सयुंक्त विद्यमाने महाराष्ट्रभर दुष्काळी छावणीवर वारकरी कीर्तनातून पर्यावरण पूरक माहिती , पाण्याचे महत्त्व , वृक्षारोपण व  दुष्काळग्रस्त क्षेत्रातील लोकांमध्ये जनजागृतीचे प्रबोधन तथा शेतकरी वर्गाचे मनोधैर्य वाढावे याकरिता कीर्तनाचे आयोजन करण्यात येणार आहे .  

सदर उपक्रमासाठी महा एनजीओ फेडरेशनकडून देगलूरकर परंपरेचे पाईक  प्रसिद्ध युवाकीर्तनकार अक्षयमहाराज भोसले यांचे नाव प्रामुख्याने पुढे आले आहे . महाराजांशी संपर्क केला असता "  दुष्काळग्रस्त आपल्या बांधवांच्या साठी मला काही सेवा करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य समझतो ." असे उद्गार अक्षयमहाराज भोसले यांचे होते . अध्यात्म क्षेत्र म्हणून ओळख असणाऱ्या वारकरी संप्रदायतील हात जेव्हा समाजसेवेसाठी पुढे सरसावतील तेव्हा खऱ्या अर्थाने संतांनी दिलेलं शिकवण समाजात जाईल .  छावणी वरील लोकानीं ह्या उपक्रमाचे भरभरुन स्वागत केले आहे . श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर , श्रीगुरु श्रीप्रमोदमहाराज जगताप , मा.शेखरजी मुंदडा ( सल्लागार - आर्ट ऑफ लिविंग , महाराष्ट्र  ) यांचे यास विशेष सहकार्य आहे .अशी माहिती शशिकांत काटे व राम जांभूळकर यांनी वारकरी संप्रदाय युवा मंच कडून  दिली .-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget