.
.
.

वक्त्याने नेहमी सकारात्मक रहावे, सकारात्मक मांडावे— सुनिल जवंजाळ

 पंढरपूर— 'वक्ता हा समाज घडविण्याचे काम करीत असतो, त्यामुळेच त्याच्यावर असलेली जबाबदारी लक्षात घेता त्याने नेहमी सकारात्मक राहिले पाहिजे व सकारात्मक मांडले पाहिजे.' असे मत सुप्रसिद्ध वक्ते व कवी सुनिल जवंजाळ यांनी मांडले. ते अभिनव अकॅडमीच्या सातव्या विद्यार्थी बॅचच्या समारोपप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विषयाचे अभ्यासक प्रा.सुधाकर पिसे होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे कवठेकर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक सुधीर पटवर्धन, कवठेकर प्रशालेचे पर्यवेक्षक व पक्षीतज्ज्ञ व्ही.एम.कुलकर्णी व अभिनव अकॅडमीचे संचालक मंदार केसकर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना जवंजाळ पुढे म्हणाले, वक्ता हा जन्मजात असतो असा आपल्याकडे एक गैरसमज आहे, परंतु वक्तृत्व ही प्रयत्नसाध्य कला असून अभिनव अकॅडमीसारख्या संस्थांमध्ये प्रशिक्षण घेऊन व वाचन, मनन, चिंतन व निरिक्षण करण्याच्या सरावातून कोणीही चांगला वक्ता बनू शकतो.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रुचा वट्टमवार हिने उपस्थितांचे स्वागत केले. सई केसकर हिने अध्यक्षीय सूचना मांडली तर सन्मित पवार याने अनुमोदन दिले. प्रशिक्षणार्थ्यांनी ईशस्तवन गायले. राधीका शहापुरे हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संचिता लादे, प्रगती ननवरे व विनीत शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. मंदार केसकर, सोमनाथ गायकवाड, मैत्रेयी केसकर व सचिन लादे यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी श्रुती कुलकर्णी, अनया सावळे, रेवती सोनार या प्रशिक्षणार्थींनी व अभ्यागत व्याख्याते डाॅ.सचिन लादे यांनी मनोगते व्यक्त केली.


प्रमुख पाहुणे सुधीर पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याचे कौतुक करुन अभिनव अकॅडमीला शुभेच्छा दिल्या तर व्ही.एम.कुलकर्णी यांनी वक्तृत्वाच्या गुणांचा उल्लेख करुन हे गुण आत्मसात करण्यासाठी आवश्यक ते कष्ट घेण्याचा सल्ला दिला. अध्यक्षीय समारोपामध्ये सुधाकर पिसे यांनी वक्तृत्वाचा इतिहास विशद करुन वक्ृत्व कलेसाठी आवश्यक असणारी प्रतिभा विकसित करण्यासाठी आवश्यक असणार्‍या गोष्टींची जाणीव करुन दिली.

सर्व प्रशिक्षणार्थींना पाहूण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, या प्रमाणपत्रांचे वाचन अभ्यागत व्याख्यात्या मैत्रेयी केसकर यांनी केले. शेवटी आभार श्रुती म्हमाने हिने मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्ना भिंगे व रक्षा परदेशी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु. प्राप्ती भट्टड, रिद्धी कुलकर्णी, ईश्वरी जोशी, रसिका पवार, अर्पिता लादे, राजनंदिनी नवगिरे, सम्मीत श्रीगोंदेकर, ओंकार सोनार, मानस यादव, सुवेद आटपाडीकर, संस्कार जगताप, विवेक नागणे, लिनेशा बेणारे, अमृता अभंगराव, ओंकार सोनार, राहुल अभंगराव, जयदिप यादव, वरद बडवे,ईश्वरी जोशी,सुरुची कुलकर्णी, वैशाली शिंदे, सौ.माया कुलकर्णी या प्रशिक्षणार्थींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला डाॅ.आनंद भिंगे, रविराज सोनार, डाॅ.प्रिया भिंगे, डाॅ.रश्मी शहापुरे, डाॅ.बेणारे, मकरंद कुलकर्णी, सचिन बेणारे, शैलेश सावळे, अतुल म्हमाने, रमेश पवार, अशोक वट्टमवार, गणेश लांबोरे यांच्यासह अनेक मान्यवर व प्रशिक्षणार्थी कार्कक्रमाला उपस्थित होते.


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget