आधारकार्डवरील पत्ता बदलण्यासाठी पुराव्याची गरज नाही- यूआयडीएआय


मुंबई : आधारकार्डच्या पत्त्यामध्ये बदल करण्यासाठी आधार केंद्राचे उंबरठे झिझवावे लागत आहेत. तसेच यासाठी निवासी पत्ता असणे गरजेचे होते. परंतू सरकारने या प्रक्रियेत बदल केल्यामुळे अनेकांचा त्रास आता वाचणार आहे. कारण अर्जदाराला निवासी पत्ता बदलण्याकरीता कोणत्याही प्रकारचा पुरावा देण्याची गरज भासणार नाही. एवढेच नव्हे तर, ऑनलाईन प्रक्रियेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे अर्जदाराला वेळ देखील वाचवता येणार आहे. मात्र, यासाठी अर्जदाराला 'यूआयडीएआय'कडून पत्ता सत्यता तपासणी पत्र मिळवावे लागणार आहे. यानंतरच पुढील प्रक्रिया पार पाडता येणार आहे.


आधारकार्ड हे महत्त्वाचे कागदपत्रे म्हणून वापरले जाते. बॅंकेत खाते उडण्यासाठी, सिमकार्ड घेण्यासाठी तसेच इतर महत्त्वाच्या कामासाठी आधारकार्ड हे आवश्यक आहे. परंतु अनेकदा आधारकार्डमध्ये चुकीचा तपशील असल्यामुळे संबधित व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 
एका ठिकाणावरुन दुसरीकडे राहायला गेलेल्या लोकांना याचा मोठा फटका बसत आहे. स्थलांतरीत झालेल्या लोकांना आधारकार्डमधील पत्ता बदलण्याठी मोठी धावपळ करावी लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे याकरीता पत्त्याशी निगडीत पुरावा देणे गरजेचे केले गेले होते. तसेच नवीन ठिकाणी राहण्यासाठी गेलेल्या अनेक लोकांजवळ पत्त्याशी संबधित पुरावा नसल्यामुळे त्यांना आधारकार्डमधील बदल करणे कठीण जात होते. 

यूआयडीएआय वेबसाइटच्या मते, पत्त्यामध्ये बदल करण्याआधी आपला मोबाईलनंबर आधार नोंदणीकृत आहे की नाही, याची खात्री करुन घेणे गरजेचे आहे. जर मोबाईल नंबर आधारशी नोंदणीकृत नसेल तर लॉग इन करता येणार नाही.  

अशा प्रकारे मिळवा पत्ता प्रमाणीकरण पत्र

ज्या रहिवाशांजवळ पत्ता संबधित पुरावा नाही, त्यांना यूआयडीएआयने पाठवलेल्या पत्त्याचे ओळख पत्र वापरून त्यांच्या पत्त्यावर बदल करता येणार आहे. पत्ता पडताळणी प्रमाणपत्र  मिळवण्याकरीता निवासी पत्ताधारकांकडून संमती मिळवणे आवश्यक आहे. पत्ताधारक हा कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र, जमीनदार इत्यादी असू शकतो, जिथे निवासी सध्या राहत आहे.


ऑनलाईन प्रक्रिया-

१) प्रथमता, अर्जदाराने नोंदणीकृत मोबाईलनंबर आधार बरोबर लॉग इन करावे. त्याचबरोबर आधारकार्डमधील माहिती भरुन सेवा विनंती क्रमांक (एसआरएन) मिळवावा. अर्जदाराने पत्ताधारक म्हणून निवडलेल्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करुन त्याचा मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे. 

२) त्यानंतर पत्ताधारकाच्या मोबाइलवर ओटीपी पाठवण्यात येणार. पत्ताधारकांना संमती देण्याकरीता होय आणि नाही असा पर्याय उपलब्ध असणार आहे. पत्ताधारकांने होय हा पर्यायावर क्लिक केल्यानंतरच पुढील कामास सुरुवात केली जाणार आहे.

३) पत्ताधारकाच्या मोबाईलमध्ये आलेला ओटीपीची खात्री करुन एसआरएन पत्त्यासह लॉग इन करा, आवश्यक असल्यास संपादन करा आणि सबमिट करा

येथे लक्षात घेण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ आधार कार्डधारकाचे पत्त्यांची माहिती ऑनलाईन दुरूस्त करता येऊ शकते. बायोमेट्रिक किंवा जन्मतारीख, लिंग, मोबाईल आणि ई-मेलमध्ये निवासींना यूआयडीएआय नावनोंदणी करण्यासाठी आधारकेंद्रात भेट द्यावे लागेल

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget