भारत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मतमोजणीबाबत मार्गदर्शन


मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे आयोजन
मुंबईदि. 16 : लोकसभा निवडणूक-2019 मतमोजणीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आज राज्यातील जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
          गोरेगाव येथे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आदर्श मतमोजणी केंद्राला निवडणूक आयोगाचे अधिकारी तसेच राज्यातील जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज भेट दिली. यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमारअतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे,पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकरभारत निवडणूक आयोगाचे संचालक निखील कुमारव्ही. एन. शुक्लामुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वेभारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव मधुसूदन गुप्ता आदी उपस्थित होते.


          लोकसभा निवडणुकीची मतमोजणी दि. 23 मे2019 रोजी होणार आहे. या मतमोजणीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजीमतमोजणीची कार्यपद्धतीमतमोजणीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले निर्देश आदींबाबत यावेळी माहिती देण्यात आली.
           मतमोजणीच्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर निकाल प्रदर्शित करणेव्हीव्हीपॅटमधील मतदान चिठ्ठयांची मोजणी याबाबत अभिरुप मतमोजणीचे (मॉक काऊंटिंग) प्रत्यक्ष प्रशिक्षण (हॅण्ड्स ऑन ट्रेनिंग) यावेळी जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले. हे अधिकारी नंतर त्यांच्या अधिपत्याखालील मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारीकर्मचाऱ्यांना मतमोजणीबाबतचे प्रशिक्षण देणार आहेत.





-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget