माता नच् तू वैरिणी.... अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पोटच्या मुलाची प्रियकराच्या मदतीने आईनेच केली हत्यासाताऱ्यामध्ये अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या मुलाची आईने प्रियकराच्या मदतीने हत्या केली आहे. गौरव चव्हाण (१० वर्ष) असं हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. वाई तालुक्यातील नावेचीवाी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. ८ दिवसानंतर ही घटना उघड झाली आहे. वैभवची आई अश्विनी चव्हाण हिने बावधन गावामध्ये राहणाऱ्या सचिन कुंभार यांच्याशी अनैतिक संबंध होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाईतील गंगापूर येथील 10 वर्षीय रोहन (नाव बदलेले) आई अश्विनीसोबत राहत होता. मागील महिन्यात २८ एप्रिल रोजी रात्री रोहन एक कार्यक्रम पाहण्यासाठी बाहेर गेला होता. मात्र, तेव्हापासून ते बेपत्ता असल्याची तक्रार आई अश्विनीने पोलिसात दिली होती. मात्र, त्यानंतर रोहनचा मृतदेह तेथील धोम धरणाच्या कालव्यात सापडला.
अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या गौरवचा त्याची आई अश्विनीने सचिनच्या मदतीने काटा काढला. देगाव या गावाच्या हद्दीतील वाहत्या कालव्यामध्ये गौरवला ढकलून देऊन दोघांनी हत्या केली होती. २९ एप्रिल रोजी कालव्यामध्ये गौरवचा मृतदेह सापडला होा. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनी या घटनेप्रकरणाचा तपास केला असता तब्बल ८ दिवसानंतर आईनेच पोटच्या मुलाची हत्या केली असल्याचे उघड झाले.
चार महिन्यापूर्वी गौरवच्या वडिलांचा मृतदेह देखील कालव्यामध्ये सापडला होता. गौरवचा देखील असाच मृत्यू झाल्यामुळे चव्हाण कुटुंबियांना संशय आला होता. दरम्यान, पोलिसांनी गौरवची आई अश्‍विनी प्रकाश चव्हाण (वय२८) आणि तिचा प्रियकर सचिन शिवराम कुंभार (वय ४१) या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने दोघांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


अश्विनी आणि सचिन कुंभार हे दोघेही वाईतील एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होते. त्यावेळी या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. पण या दोघांच्या प्रेमसंबंधात अश्विनीचा मुलगा अडसर ठरत होता. त्यामुळे अश्विनीने सचिनच्या मदतीने मुलाचा काटा काढायचा ठरवले. त्यानुसार 28 एप्रिलला अश्विनी व सचिनने रोहनला रात्री साडेदहाच्या सुमारास धोम धरणाच्या कालव्याजवळ नेले. त्याच्या आईने त्याला सरबतात गुंगीचे औषध दिले. रोहन बेशुद्ध होताच सचिनने त्याला पाण्यात ढकलले. यानंतर दोघेही घरी गेले. यानंतर आई अश्विनीने मुलगा रोहन बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मात्र, पोलिसी खाक्यामुळे तिने अनैतिक संबंधात मुलाचा अडसर होत असल्याने रोहनची हत्या प्रियकराच्या मदतीने केल्याची कबुली दिली.-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget