.
.
.

महिला "गाईड" सांगताहेत वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट…!मुंबई, दि29 : आपण वन पर्यटनाला जातोगड किल्ल्यांना भेटी देतोसागरांच्या लाटांवर स्वार होतोया सगळ्या स्थळांची माहिती जाणून घेणंत्याचा इतिहास समजून घेणंही आपल्यालाआवडतंअशावेळी आपल्या मदतीला येतात ते पर्यटक मार्गदर्शक म्हणजे "गाईड"!  पुरुषांची मक्तदारी असलेल्या या क्षेत्रात महिलांनी कधीच शिरकाव केला असला तरी घनदाट जंगलात पर्यटकांनाघेऊन जाणंत्यांची सुरक्षितता जपतांना त्यांना त्या वनाचीतिथल्या जैव विविधतेची संपूर्ण आणि अचूक माहिती देणं हे जरा हटके काम स्वीकारलं आहे, राज्यातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील स्थानिकयुवतींनी..! या वेगळ्या वाटेवरून जाताना त्यांनी स्वावलंबनाचा मार्ग तर चोखाळला आहेच परंत निसर्ग रक्षणाच्या कामात योगदानही दिले आहे.राज्यात बोरमेळघाटपेंचनवेगाव-नागझिरासह्याद्री आणि ताडोबाअंधारी  असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेतयापैकी ताडोबा-अंधारीमेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसोबतजंगल भ्रमंती करताना या महिला गाईड सांगत आहेत तिथे अधिवास करणाऱ्या वाघोबाच्या साम्राज्याची गोष्टघडवताहेत तिथल्या जैव विविधतेचे दर्शनमेळघाट व्याघ्र प्रकल्पात ३०पेंच व्याघ्रप्रकल्पात १२ आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात  महिला गाईड कार्यरत आहेतत्यामुळे तुम्ही जर कधी मेळघाटपेंच किंवा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आणि महिला "गाईडतुम्हाला याजंगलाची ओळख करून देतांना दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली  नुकत्याच झालेल्या  व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या बैठकीत ही माहिती  देण्यात आली.  व्याघ्र प्रकल्पाच्या बफरक्षेत्रात तसेच वनालगतच्या गावांमध्ये स्थानिक महिलांना विविध व्यवसायउद्योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण केले जात आहेत्याचाच हा एक भाग आहेअचूक आणि परिपूर्ण माहितीनेसमृद्ध गाईड आलेल्या पर्यटकाला जंगलभ्रमंतीचा उत्तम आनंद देऊ शकतो हे विचारात घेऊन या वन पर्यटक मार्गदर्शकांना प्रशिक्षण दिले गेले आहे.
-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget