.
.
.

पंढरपूर शहराचे सुरक्षेसाठी 6 कोटी रुपयांचे सीसीटीव्ही -आमदार प्रशांत परिचारक

पंढरपूर :- पंढरपूर शहराच्या सुरक्षेच्यादृष्टीने शहरात विविध ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणेकामी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचेकडे मागणी केली असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. यासाठी रू.6 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. पंढरपूर शहरातील नागरीकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात यासाठी शासनाने विविध योजनांमार्फत पंढरपूर शहरातील विविध कामांना तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविणेस निधी उपलब्ध करून देणेबाबत मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शविली आहे. अशी माहिती आमदार परिचारक यांच्या कार्यालयातुन एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

दक्षिण काशी मानल्या जाणार्‍या तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरात सध्या भाविकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. पंढरपूर शहरात दरवर्षी आषाढी, कार्तिकी, चैत्र, माघ या चार
मोठ्या यात्रा भरत असतात. यामध्ये आषाढी वारी ही सगळ्या मोठी वारी असून या वारीकाळात पंढरपूर शहरात 10 ते 12 लाख भाविक पंढरपूरात दाखल होत असतात. यामध्ये इतर राज्यातूनही येणार्‍या भाविकांची संख्या खूप आहे. तसेच व्हीव्हीआयपी, मंत्री महोदय, शासकीय अधिकारी आदी महत्वाचे व्यक्तींचे येणेचे प्रमाणही जास्त आहे. तसेच दैनंदिन श्री.विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांचे प्रमाणही 20 ते
25 हजार इतके आहे. या येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी वाहतूक नियंत्रण करणे, गर्दीचा फायदा घेवून भुरट्या चोरांवर आळा घालणे आदी बाबीं करणेसाठी पोलीस व पंढरपूर नगरपालिका प्रशासनावर नेहमीच ताण पडतो. या सर्वांवर लक्ष ठेवणेसाठी सीसीठीव्ही नियंत्रण कक्ष असणे गरजेचे होते.




यात्रा कालावधीत पंढरपूर शहरालगत असणार्‍या 65 एकर परिसरात भाविकांच्या सोईसाठी स्वच्छता गृह व राहण्याची सोय शासनामार्फत केलेली असून या ठिकाणी 3 ते 4 लाख भाविक वारी काळात वास्तव्यास असतात. तसेच पंढरपूर शहरालगत गोपाळपूर, विसावा-इसबावी व इतर ठिकाणी भाविक वारी काळात वास्तव्यास असतात. वारीकाळात चोरीचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती या मोटार सायकलीवरून येवुन महिलांचे अंगावरील दागिने हिसकावने, अडवणुक करून बळजबरीने लुटमार करणे आदी प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असतात. पंढरपूर शहरात विविध ठि।सीं;काणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास पोलीस यंत्रणा, नगरपालिका आदी प्रशासनावर पडणारा ताण कमी होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविणेसाठी विविध ठिकाणांची पाहणी करणेसाठी नगरपालिकेमार्फत माहिती घेवून प्रस्ताव तयार केला आहे.


यामध्ये पंढरपूर शहरात सुरक्षेसाठी तब्बल 430 कॅमेरे बसविणे अपेक्षीत आहे. त्यापैकी 30 सीबीझेड फिरणारे कॅमेरे शहरातील सर्व प्रमुख रस्ते, 65 एकर परिसर, घाट, प्रदक्षिणा मार्ग, वाखरी पालखीतळ, अहिल्यादेवी होळकर चौक, शिवाजी चौक अशा गर्दीचे व अतिदक्षतेचे ठिकाणी कार्यान्वित करून नियंत्रण कक्षाव्दारे लक्ष ठेवणे सोयीस्कर होईल यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत सीसीटीव्ही लवकरात लवकर बसविणेत यावेत अशी मागणी आ.प्रशांत परिचारक यांनी केली आहे. यासाठी रू.6 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. 


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget