.
.
.

... आणि पत्रकाराविरुध्द बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करु पाहणार्‍या महिलेचा खोटारडेपणा उघड झाला....पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक किरण आवचर यांची सतर्कता


पंढरपूर तालुक्यातील एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर रात्रीच्या 1 वाजता बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या एका महिलेचा खोटारडेपणा उघड झाला असुन पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण आवचर यांच्या सतर्कतेमुळे एका पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल होता होता टळला.

 पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाणेत काल दि. 5 जुन च्या रात्री 1 वाजता पंढरपूर तालुक्यातील एका गावची महिला आली व माझ्यावर ..... या पत्रकाराने बलात्कार केला असुन त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करायचा असल्याचे सांगितले. परंतु संबंधीत पत्रकाराने सायंकाळीच पोलिसांना भेटुन माझ्यावर बलात्काराची खोटी केस करणार असल्याची धमकी सदर महिलेने दिली असल्याचे कळवले होते. संबंधीत पत्रकाराची दखलपात्र तक्रारही पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झालेली होती. रात्री सहा ते नऊ वाजेपर्यंत सदर पत्रकार हे पोलिस ठाण्यात हजर होते. परंतु सदर महिलेने आपल्यावर रात्री साडे सात वाजता बलात्कार केला असल्याचे सांगितल्याने सदर महिलेचा खोटारडेपणा उघडकीस आला.

याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आवचर यांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर हकीकत खालीप्रमाणे.  काल दिनांक 5/6/ 2019 रोजी पंढरपूर तालुक्यातील एका वृत्तवाहिणीचे पत्रकार यांचे नातेवाईक हे त्यांच्याविरुद्ध खोटी बलात्काराची केस करणार आहेत, याची त्यांना माहिती लागले वरून ते सायंकाळी सहा वाजता पोलीस ठाणे येथे आले व त्यांनी याबाबत आम्हाला माहिती दिली असता त्यांना सदर बाबत व दखलपात्र तक्रार नोंद करणे बाबत समज दिली. त्यानंतर वीस तीस वाजता व दखलपात्र तक्रार नोंद करण्यात आली. सदरचे पत्रकार हे रात्री नऊ वाजेपर्यंत पोलीस ठाणे येथे हजर होते. पत्रकार यांचे नातेवाईक महिला रात्री एक वाजता पोलीस ठाण्यात येऊन पत्रकार यांचे विरुद्ध त्यांनी साडेसात वाजता त्यांच्यावर बलात्कार केला अशी कथा सांगत असताना त्यांना सकाळी पोलिस ठाण्यात बोलावले. आज रोजी सकाळी सर्व नातेवाईकांना समक्ष पुन्हा सदर महिलाही बलात्कार बाबत तक्रार करत असताना रात्री साडेसातची वेळ सांगत असताना त्यांना सीसीटीव्ही फुटेज बाबत माहिती दिली असता त्या खोटे बोलत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांची तक्रार नोंद करण्यात आली नाही. तसेच त्यांचा याबाबत सविस्तर जबाब नोंद करण्यात आला आहे. 

प्रामाणिक पत्रकारांना बदनाम करण्याचे व पत्रकारांना अडचणीत आणण्याचे षडयंत्र रचणारांना उघडे पाडायला हवे!

रात्रंदिवस आपला जीव धोक्यात घालुन प्रामाणिकपणे पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांवर  अशा पध्दतीने खोटे गुन्हे दाखल करुन पत्रकारांना बदनाम करणारांचे व पत्रकारांना अडचणीत आणणारांचे बींग वेळीच फोडुन अशांना उघडे पाडायला हवे. तर अशा घटना थांबतील.


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget