.
.
.

आषाढी यात्रे निमित्त वाहतूक मार्गात बदल


सोलापूर:-  येत्या 12 जुलै रोजी होणा-या आषाढी  यात्रे निमित्त पंढरपूर शहरातील तसेच शहरा बाहेरील वाहतुक मार्गात बदल करण्यात आला असून,हा बदल दि. 03 ते 17 जुलै 2019  या कालावधीपर्यंत राहणार आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पंढरपूर शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांना सूचना :-  पंढरपूरात यात्रे निमित्त नगरबार्शीसोलापूरमोहोळ कडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड, (अहिल्यादेवी चौक) शेटफळ चौक मार्ग विसावा येथे पार्क करावीत. 65 एकर येथे फक्त दिंडी व पालखीचे वाहने पार्क करावीत. पुणेसातारावाखरीमार्गे येणारी वाहने कॉलेज क्रॉस चौकीच्या पाठीमागील मैदानात पार्क करावीत. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्क करावीत. कोल्हापूर, सांगलीमिरजसांगोला मार्गे  येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळी बायपास मार्गे येवून टाकळी हायस्कुल व वेअर हाउस येथे पार्क करावीत. तसेच विजापूर, मंगळवेढा मार्गे येणारी वाहने टाकळी मार्गे वेअर हाऊस व यमाई तुकाई मंदीर व बिडारी बंगला सेशन कोर्टाशेजारी  पार्कींग करावीत. यात्रा कालावधीत शहरात येणारी हलकी वाहने अंबाबाई पटांगण, गजानन महाराज मठ, नगरपालिका पार्कींग, क्रीडा संकुल, सखुबाई पार्कींग तसेच संबधीत मठामध्ये पार्क होतील इतर वाहने जुन्या कराड नाक्यासमोरील रेल्वे मैदान व मार्केट यार्ड येथे पार्क करतील. त्याचबरोबर शहरातील अंतर्गत रोडवर कोणत्याही ठिकाणी गाड्या पार्क करण्यास मनाई असेल.
पंढरपूर शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांबाबत सूचना :-  पंढरपूर शहरातून टेंभुर्णीनगर, सोलापूरलातूरकडे जाणा-या सर्व वाहने सावरकर चौक, नवीन कराड नाकाकॉलेज क्रॉस रोडकरकंब चौक मार्गे जातील.पुणे-साता-याकडे जाणारी वाहने सावरकर चौक, नवीन कराड नाकावाखरी मार्गे जातील तर विजापूरकराडआटपाडी, कोल्हापूरसांगलीमिरजमंगळवेढा मार्गे जाणा-या सर्व गाड्या सावरकर चौक, गादेगांव फाट्या पासून जातील.
पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतुकीबबात :- 03 ते 17 जुलै पर्यंत  प्रदक्षिणा मार्गमहाव्दार चौक ते शिवाजी चौकसावरकर चौक ते शिवाजी चौक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. बार्शी, सोलापूर मार्गावरुन येणारी हलकी वाहने तीन रस्ता, अहिल्या देवी चौक, नवीन पुला मार्गे नगरपालीकेच्या वाहनतळावर जातील.  नियमित ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणा-या एस.टी. बसेसना जुना दगडी पुल व तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक या मार्गाने येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी आहे.अंबाबाई पटांगण ते अर्बन बँकसावरकर चौक ते अर्बन बँक, भक्ती मार्ग ते काळा मारुती चौक,  लहुजी वस्ताद चौक ते काळा मारुती चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनासांठी बंद ठेवण्यात येणार आहे.पार्किंग व्यवस्था सूचना  :-  नगरबार्शीसोलापूरमोहोळ कडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड तीन रस्ता मार्गे विसावा व नगरपालिकेच्या वाहनतळावर  पार्किग करतील. पुणेसातारावाखरी,मार्गे येणारी वाहने
इसबावी, विसावा तसेच कॉलेज क्रॉस रोड किंवा कॉलेज क्रॉस चौकीच्या पाठीमागील मैदानात पार्क करावीत. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्क करावीत. कोल्हापूर,सांगलीमिरजसांगोला मार्गे  येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळी मार्गे येवून टाकळी हायस्कुल व वेअर हाउस येथे पार्क करावीत. विजापूर, मंगळवेढाकडून येणारी वाहने अनवली फाटा, कासेगाव कासेगाव फाटा टाकळी मार्गे वेअर हाऊस व यमाई तुकाई मंदीर व बिडारी बंगला सेशन कोर्टाशेजारी  पार्कींग करावीत. यात्रा कालावधीत शहरात येणारी हलकी वाहने अंबाबाई पटांगण, गजानन महाराज मठ, नगरपालिका पार्कींग, क्रीडा संकुल, सखुबाई पार्कींग तसेच संबधीत मठामध्ये पार्क होतील इतर वाहने जुन्या कराड नाक्यासमोरील रेल्वे मैदान व मार्केट यार्ड येथे पार्क करतील. शहरातील अंतर्गत रोडवर कोणत्याही ठिकाणी गाड्या पार्क करण्यास मनाई असेल.
एकेरी मार्ग:- कॉलेज क्रॉस रोड ते सरगम चौक ते सावरकर चौक ते नवीन  कराड नाका यामार्गावर एकेरी वाहतुक राहील.     


एस. टी. बसच्या वाहतुकीबाबत सूचना :- विदर्भ, मराठवाडा, सोलापूर येथून येणाऱ्या एस.टी.बसेस भिमा बस स्थानक थांबतील व तेथेच पार्क होतील. नगर, नाशिक, जळगाव  येथून येणाऱ्या एस.टी.बसेस आहिल्यादेवी चौक येथे भाविकांना सोडून विठ्ठल सह.साखर कारखाना, गुरसाळे येथे  पार्क होतील. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व कोकण विभाग येथून येणाऱ्या एस.टी.बसेस कासेगाव फाटा, गादेगाव फाटा, सातारा नाला, बाजीराव विहीर, कौठाळी बायपास फाटा,जुना अकलूज रोडने चंद्रभागा बसस्थानक येथे पार्क होतील. कोल्हापूर, सांगली, मंगळवेढा व कोकण विभाग येथून येणाऱ्या एस.टी.बसेस कासेगांव रोड आयटीआय कॉलेज येथे पार्क होतील. तसेच संबधीत ठिकाणाहून भाविकांना परत घेवून जातील.
शहराबाहेरुन जाणाऱ्या वाहतुकीबाबत सूचना :- सोलापूर, बार्शी, नगर बाजुकडून नियमीतपणे पंढरपूर मार्गे बाह्यवळण मार्गावरुन वेळापूर, अकलूज, महुद, सांगोला, मंगळवेढा कडे जाणारी जड व अवजड  वाहनांना मोहोळ शिवाजी चौक, शेटफळ फाटा, अहिल्या चौक येथून पंढरपूर मार्गे जाण्यास प्रवेश बंदी  आहे. ही वाहने मोहोळ, कामती, मंगळवेढा, सांगोला किंवा शेटफळ, टेभुर्णी, वेळापूर, साळमुख फाटा, महुद, सांगोला मार्गे या पर्यायी मार्गे इच्छित स्थळी जातील.
विजापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, आटपाडी,  पुणे बाजुकडून नियमितपणे येवून पंढरपूर मार्गे बाह्यवळण मार्गावरुन टेंभुर्णी, शेटफळ, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला कडे जाणारी जड व अवजड वाहने, गॅस सिलें डर, केरोसीन, डिझेल, पेट्रोल, शासकीय अन्न-धान्य वाहतुक करणारी वाहने वगळण्यात आली आहेत.   कुरुल फाटा, मंगळवेढा नाका, सांगोला नाका, महुद फाटा, साळमुख फाटा, वेळापूर  येथून पंढरपूर मार्गे जाण्यास बंदी आहे. ही वाहने कामती, मंगळवेढा, सांगोला, महुद वेापूर, अकलूज, टेंभुर्णी  या पर्यायी मार्गे इच्छित स्थळी जातील.
संबधित भाविकांनी व वाहनधारकांनी या बदलेल्या वाहतुक मार्गाची नोंद घेऊन वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी,असे आवाहन वाहतुक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.    


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget