.
.
.

नगरपरिषद कर्मचा-यांना ७वा वेतन लागु करावा: पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन

पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्यावतीने नगरपरिषद कर्मचा-यांना ७वा वेतन लागु करावा व इतर मागण्यांसाठी धरणे आंदोलन


      महाराष्ट्र शासनाने नगरपरिषद कर्मचा-यांना ७वा वेतन आयोग देण्याची घोषणा केली परंतु अद्यापर्यंत नगरपरिषद, नगरपंचायतीमधील कर्मचा-यांना व संवर्गामधील कर्मचा-यांना ७वा वेतन आयोग लागु केला नाही. म्हणुन महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, संवर्ग व सफाई कर्मचा-यांना ७वा वेतन आयोग लागु करावा व इतर विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व कामगार संघटनेच्यावतीने राज्याचे अध्यक्ष डॉ.डी.एल. कराड, पुणे विभागाचे अध्यक्ष प्रा.ए.बी.पाटील, जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व नगरपरपरिषदे समोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. 
पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्यावतीने पंढरपूर नगरपरिषद कर्मचा-यांना ७वा वेतन लागु करावा व इतर मागण्यांचे निवेदन पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, सह.कार्याध्यक्ष शरद वाघमारे यांनी नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले, मुख्याधिकारी अभिजीत बापट, पक्षनेते अनिल अभंगराव, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, नगरसेवक महादेव भालेराव यांना दिले.   
यावेळी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचे जनरल सेक्रेटरी यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य नगरपरिषद समन्वय समितीच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर, आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालयचे एम.संकर नारायण यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. चर्चा सकारात्मक होवुनही कर्मचा-यांच्या मागण्या बाबतचा निर्णय व आदेश निघाले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व संवर्ग, नगरपालिका नगरपंचायत कर्मचा-यांना १ जानेवारी २०१६ पासुन ७ वा वेतन आयोग त्वरीत  लागु करावा, शासनाने ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायती व नगरपरिषदांमध्ये नव्याने केलेले आहे या नगरपंचायती मधील कर्मचारीसफाई कर्मचारीरोजंदारीकंत्राटी कामगार यांचे विना शर्त विना अट समावेशन करावे व त्यांचा ग्रामपंचायत मधील सेवा कालावधी पेन्शन पात्र सेवा कालावधी धरावीशासनाने नगरपरिषदकर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा चे दरमहा  वेळेवर व्हावे म्हणून सहा वेतन अनुदानाची रक्कम तरतूद केली पण 1800 कोटी ऐवजी 1600 कोटी च रक्कम मंजूर केल्याने नगरपरिषद कर्मचारी चे 2 ते 3 महिने वेतन झालेले नाही तरी सहा वेतन अनुदानाची पूर्ण रक्कम संचालक कार्यलयाकडे द्यावी व कर्मचा-यांचे वेतन १ तारखेला करावे तसेच सेवा निवृत्त कर्मचारी व संवर्गातील कर्मचा-यांच्या थकीत रक्कमा त्वरीत अदा कराव्यात. रोजंदारीकंत्राटी कामगार यांना कायम करावे व उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समान काम समान वेतनाची अंमलबजावणी करावी संचालकांनी वारंवार आदेश काढून ही आजही किमान वेतन कर्मचारी ना  दिले जात नाही ते त्वरित  द्यावेअनुकंपा ची भरती त्वरित करावी२७ मार्च २००० पर्यंत चे काही रोजंदारी कर्मचा-यानां अध्याप कायम केलेंले नाही त्यांना त्वरित कायम करावे शक्यतो त्यांचे त्याच नगरपरिषद मध्ये समावेशन करावे नगरपरिषद कर्मचा-याना २४ वर्ष कालपद्ध  पदोन्नती ज्या तारखे पासून 24 वर्ष पूर्ण झाले आहेत त्या दिवसापासून लागु करावी व 7 वा वेतन लागू झाल्या नंतर 10,2030 वर्षांची कालबद्ध पदोन्नती मिळावी कर व प्रशासकीय सेवा मधील कर्मचारी यांना 5000-8000 वेतन श्रेणी लागू करून 4200 ग्रेड पे लागू करावा व जाचक बदली धोरण रद्द करावे ,सफाई कामगार व इतर वर्ग 4 चा कर्मचारी यांना वर्ग 3 वर पदोन्नती द्यावी, संवर्ग कर्मचारी चे प्रश्न मार्गी लावावेत, सफाई कर्मचारी यांना मोफत घरे द्यावीत व इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले.  
हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, सह.कार्याध्यक्ष शरद वाघमारे, यांचे नेतृत्वाखाली, प्रितम येळे, नागनाथ तोडकर, उपाध्यक्ष किशोर खिलारे, जयंत पवार, अनिल गोयल, पराग डोंगरे, सुखदेव माने, लेखापाल रवि वाघमारे, कर अधिकारी प्रज्ञा देशमुख, सहा.लेखापाल अभिलाषा नेरे, संतोष सर्वगोड, दत्तात्रय चंदनशिवे, जिजा शिंदे, जया वाघेला, लक्ष्मीबाई हुंडेकरी, राजेंद्र देशपांडे, पोपट जाधव, सुनिल बोडके, दिनेश साठे, संजय माने यांनी बेमुदत आंदोलन यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले. १ जुलै २०१९ पर्यंत मागण्या मान्य झाल्यास २ जुलै २०१९ पासुन महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायती मधील कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करतील असा इशारा जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर यांनी दिला. 








-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget