स्वेरीच्या तीन विद्यार्थ्यांची कॉम्प्युक्ट्रॉनिक्स कंपनीत निवड


पंढरपूरः-कॉम्प्युक्ट्रॉनिक्स सिस्टम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
       सॉफ्ट्वेअरशी संबंधीत इंदौर येथील कॉम्प्युक्ट्रॉनिक्स’ या राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीचे एच.आर. विनय दुबे, विभास व त्यांच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून इंजिनीअरिंगच्या कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील सचिन स्वामी व सुरज वरपे तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा अजिंक्य शहाणे या तीन विद्यार्थ्यांची कंपनीसाठी निवड करण्यात आली. 

श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये दररोज नवनवीन व आंतरराष्ट्रीय कंपन्या येतात आणि कंपनीसाठी पात्र असे विद्यार्थ्यांची निवड करतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात? याचा सखोल अभ्यास करून मागणी तसा पुरवठा या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थीनींना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळप्रा. डी.ए. कुंभार व प्रा. एस. व्ही. दर्शने आदी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विषेशतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्यविभागप्रमुख,इतर अधिष्ठाताप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.   






-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget