.
.
.

पंढरपूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ईद-ए-मिलन साजरा


पंढरपूर... पंढरपूर तालुका वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ व MIM च्या वतीने वंचित समूहातील बंधुभाव दृढ करण्याच्या उद्देशाने गुरुवार, दिनांक 13 जून 2019 रोजी सायंकाळी 6.00 वाजता गौतम विद्यालय, पंढरपूर येथे ईद-ए-मिलन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते, रिपब्लिक होलार परिषदेचे अध्यक्ष एस. के. ऐवळे होते.
यावेळी राज्य उपाध्यक्ष सुनिल वाघमारे, धनगर समाज नेते, जिल्हा संघटक माऊली हळणवर, अँड. अखिलेश वेळापूरे, परीट समाज नेते नागेश पवार, चर्मकार समाज नेते नितीन बनपूरकर, कृष्णा वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
एमआयएमचे तालुकाध्यक्ष आदम मुजावर, वंचितचे तालुकाध्यक्ष मल्हारी बनसोडे, भारिपचे मोहोळ तालुकाध्यक्ष राजू आवारे, जेष्ठ पत्रकार श्रीकांत कसबे, प्रा. धैर्यशील भंडारे, एमआयएमचे शहराध्यक्ष जुबेर बागवान, वडार समाज नेते राजू धोत्रे, मेहतर समाज नेते गुरू दोडिया, विनोद तोरणे यांच्यासह विविध समाजातील वंचित लोक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारिपचे तालुकाध्यक्ष अँड. सुरेश कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा कार्यकारिणी सदस्य बी. आर. भोसले यांनी केले तर आभार शहर सचिव रमेश ओहाळ यांनी मानले.








-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget