.
.
.

स्वेरीमध्ये येत्या १७ जून पासून प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीचे मोफत सराव वर्ग सुरु


पंढरपूर- ‘येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुट,पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सन २०१९-२० करीता पदवी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी (F. Y. B. Tech.) व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (D.S.E.) करीता येत्या सोमवारपासून १७ जून पासून मोफत सराव वर्ग प्रारंभ होत असून याचा लाभ बारावी सायन्समधून  उत्तीर्ण झालेले विद्यार्थी घेवू शकतात.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.
           प्रवेश प्रकीयेसाठी लागणारा दीर्घ कालावधी, यामुळे विद्यार्थ्यांचा नाहक वाया जाणारा वेळ व या वेळातच  विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी बाबत सखोल माहिती व्हावी याकारणाने येत्या सोमवार पासून अर्थात दि.१७ जून पासून स्वेरीने प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सराव वर्ग घेण्याचा निर्णय स्वेरी व्यवस्थापनाने घेतला आहे. यंदा ‘सेतू सुविधा केंद्र सुरु करून नवीन नियम राबविला आहे. यामुळे आता रजिस्ट्रेशन करणे, त्यानंतर कागदपत्रे पडताळणी व दुरुस्ती आणि त्यानंतर विकल्प फेऱ्या (कॅप राउंडस्) या प्रक्रियांना साधारण दीड ते दोन महिन्यापर्यंतचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नाकारता येत नाही म्हणून नुकसान टाळण्यासाठी हा मोफत सराव वर्ग अभ्यासक्रम सुरु करण्याचे आयोजिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळी वाया जाणार नाही त्याचबरोबर प्रवेश प्रक्रीयेबाबत अपडेट्स मिळणे सोईचे होईल. या सराव वर्गासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तरी होणारे नुकसान टाळण्यासाठी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या मोफत मिळालेल्या संधीचा फायदा घ्यावा. असे आवाहन अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. पी. एस. कचरे यांनी केले आहे. पदवी अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. पी. एस. कचरे (९५४५५५३७७४), स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार (९५४५५५३८८८), प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे (९५४५५५३८७८) व प्रा. यु. एल. अनुसे (९१६८६५५३६५) तसेच टोल फ्री क्रमांक १८०० ३००० ४१३१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.








-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget