.
.
.

दारूच्या नशेत प्राॅपर्टीसाठी बापालाच खुनाची धमकी देणाऱ्या आढीवच्या योगेशचा खुन


 पंढरपूर मधील इसबावी येथे असलेले घर माझ्या नावे करुन द्या, अन्यथा मी तुमचा खुन करीन. अशी  धमकी जन्मदात्या बापालाच देणा-या दारुड्या तरुणाचा अज्ञात आरोपींनी खुन केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

याबाबत इसबावी, पंढरपूर येथील धनाजी पंढरी दरगुडे (वय-५६) यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात आपला जबाब नोंदवला आहे.
त्यांनी दिलेल्या जबाबानुसार ते एस.टी. महामंडळात नोकरीस होते. ४० वर्षांनंतर ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती नंतर त्यांनी आपली सर्व प्राॅपर्टी दोन मुलांच्या नावे केली. परंतु मुले व्यसनी निघाली.

त्यांचा एक मुलगा पुण्यात असतो तर ज्याचा खुन झाला तो योगेश धनाजी दरगुडे (वय२८) हा आढीव, विसावा, विठ्ठलवाडी, ता‌‌. पंढरपूर येथे राहत होता.त्याचे दोन लग्न झालेले होते, त्याची पहिली पत्नी फक्त वर्षभरच नांदावयास होती यानंतर त्याचे दुसरे लग्न झाले होते. दुसऱ्या पत्नीपासून त्याला एक मुलगा आहे.

योगेश हा व्यसनाधीन होता. इसबावी येथील घर माझ्या नावावर करा नाहीतर तुमचा खुन करेन. अशी धमकी त्याने जन्मदात्या पित्याला दिली होती. दि. १२ जुनं २०१९ रोजी योगेश च्या चुलत्याच्या घरी विवाह समारंभ असतानाच याच दिवशी त्यांचा मृतदेह आढीव येथील राहते घरी आढळुन आला. त्याच्या चेहऱ्यावर व पायांच्या नडगीवर वाळलेले रक्त होते तर खोलीमध्ये सर्वत्र रक्त दिसत होते.

हा गुन्हाच कोणी व का केला याचा तपास पंढरपूर तालुका पोलिस करत आहेत.






-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget