मुलांच्या शैक्षणिक यशात वडिलांचाही मोलाचा वाटा: सर्वेक्षण


~ ५६% पितांना आपल्या मुलांच्या शिक्षणात खूप रस ~
~ ४८% पिता मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये सहभागी होण्यासाठी करतात प्रोत्साहित ~
मुंबई, १२ जून २०१९: मुलांचे शैक्षणिक यश सुनिश्चित करण्यात त्यांच्या वडिलांचा वाटा मोलाचा आहे. प्रत्येक तीनपैकी एक पिता आपल्या मुलाला अभ्यासात मदत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागत असतो. आधुनिक वडील-मुलाच्या नात्याचे आयाम समजून घेण्यासाठी आणि विशेषतः मुलाच्या शैक्षणिक जीवनात पित्याच्या भूमिकेचे मूल्यमापन करण्यासाठी पीअर टू पीअर कम्युनिटी ब्रेनलीने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब निदर्शनास आली आहे. मुलाचे व्यक्तिमत्व आणि दृष्टिकोन घडवण्यात त्याच्या वडिलांची भूमिका कशी महत्त्वाची असते यावर या सर्वेक्षणातून प्रकाश टाकण्यात आला. आपल्या मुलांना त्यांच्या अभ्यासात केवळ त्यांच्या माताच मदत करतात या जुन्या कल्पनेला देखील या अभ्यासातून छेद देण्यात आला.
मुंबईतील सुमारे १००० विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणातून दिसून आले की ७०% मुलांना शैक्षणिक यश सुनिश्चित करण्यात वडिलांची भूमिका महत्वपूर्ण वाटते. मुंबईत अनेक पिता आपल्या मुलांच्या शिक्षणात रस घेतात पण त्यापैकी बरेचसे, मुख्यतः त्यांच्या नोकरीच्या व्यस्ततेमुळे, मुलांना त्यांच्या अभ्यासात सक्रिय आणि परिणामकारकरित्या मदत करू शकत नाहीत. उदाहरणार्थ ५६% पितांना आपल्या मुलांच्या शिक्षणात खूप रस असल्याचे दिसून आले, पण त्यातील फक्त १/३ मुलांना अभ्यासात मदत करू शकत आहेत. ४०% पिता आपल्या मुलांनी पुस्तके आणि नोट्स यांच्या माध्यामातून अभ्यास करावा अशा मताचे आहेत तर ३०% पिता ब्रेनलीसारख्या ऑनलाइन मंचांची शिफारस करतात. हे स्पष्टपणे दर्शवते की अधिकाधिक पालक आता वैकल्पिक ऑनलाइन अभ्यास पद्धती आणि त्यांचे फायदे याबाबत जागरूक होत आहेत. विशेषतः, जेव्हा ते स्वतः आपल्या मुलांना त्यांच्या अभ्यासात मदत करण्यासाठी वेळ देऊ शकत नसतील.
या अभ्यासातून हे समजले की, ४८% पिता आपल्या मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतात आणि अशा प्रकारे अभ्यास आणि मौज यांच्यात चांगले संतुलन साधण्यात मदत करतात. सहभागींपैकी ७९% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना असे वाटते की,त्यांचे शैक्षणिक यश सुनिश्चित करण्यात त्यांच्या वडिलांचा मोठा वाटा आहे.


ब्रेनलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मिशेल बोर्कोव्हस्की म्हणाले,आपले शैक्षणिक ध्येय साध्य करण्यासाठी उत्तम तयारी करणे हे आज बहुतांशी मुलांचे लक्ष्य असते, मग ही तयारी शाळेच्या, शिक्षकांच्या किंवा ट्यूटरच्या मदतीने असो. परंतु, या मागील प्रेरणा ही बहुतेक वेळा त्यांचे पालकच असतात. खरी गोष्ट ही आहे की, माता पिता हे दोघेही आपल्या मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका या ना त्या प्रकारे बजावत असतात. मुंबईच्या बाबतीत सांगायचे तर पिता हे आपल्या मुलांच्या अभ्यासेतर प्रवृत्तींच्या बाबतीत प्रोत्साहक आहेत. आपल्या मुलाच्या शिक्षणाव्यतिरिक्त त्यांच्या इतर प्रवृत्तींमधील प्रतिभेला देखील पिता महत्त्व देत असतात हे एक उत्साहवर्धक लक्षण आहे.”






-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget