श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये आषाढी वारी सोहळा नियोजन बैठक संपन्न


 पालखी मार्गावर टँकरव्दारे पाणी पुरवठा..पालकमंत्री विजय देशमुख यांची माहिती

पंढरपूर दि. १३ :-  आषाढी वारी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी पालखी मार्गावर आवश्यक टँकर व विहीर अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री विजय देशमुख यांनी आषाढी वारी सोहळा नियोजनाच्या बैठकीत दिली .
            आषाढी वारी 2019 च्या नियोजनासाठी तुकाराम भवन येथे जिल्ह्यातील सर्व संबंधित जिल्हास्तरीय अधिकारी व मानाच्या पालख्यांचे विश्वस्त यांची बैठक झाली. बैठकीस आमदार गणपतराव देशमुख, भारत भालके, प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रजनी देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष  गहिनीनाथ-महाराज औसेकर महाराज उपस्थित होते.
            पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले, आषाढी वारी सोहळ्यास येणाऱ्या सर्व भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. यामध्ये पिण्याचे पाणी, शौचालये, अखंडीत वीज पुरवठा, सुरक्षा या बाबींना प्राधान्य द्यावे. पालखी मार्गावरील रस्त्यांची कामे, दुरुस्ती, पालखी मुक्कामाची  व विसावा ठिकाणची कामे करण्याबरोबरच पालखी विश्वस्तांनी सुचविलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावीत .
            जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले, ‘यावर्षी आषाढी वारीत सोहळ्यात स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार आहे. वारी पूर्वी आणि वारी नंतर पंढरपुरातील स्वच्छता करण्यात येईल. प्रदक्षिणा मार्गावर खचखडी राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल. प्रशासनामार्फत वारकऱ्यांना आवश्यक सेवा सुविधा पुरविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे ’.



डॉ. भोसले म्हणाले, ‘आषाढी वारीत करावयाच्या कामांच्या‍ नियोजनासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येऊन त्यांना त्यानुसार कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या पुढेही आवश्यकता भासल्यास संबंधितांची बैठक घेऊन कामांचा आढावा घेण्यात येईल ’. 
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘ पालखी मार्गावर सर्व सुविधा देण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले असून वारकाऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात २७ टँकर, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात २२ टँकर पुरवण्यिात येणार असून मानाच्या अन्य पालखी सोहळ्यात आवश्यकतेनुसार टँकर पुरविण्यात येणार आहेत. पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक विहरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पालखी मार्ग व पंढरपूर, वाखरी व ६५  एकर  येथे पुरेशी शौचालये उपलब्ध करण्यात आली आहे ’. 
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘आषाढी वारी सोहळ्यात चंद्रभागा नदीत पुरेसे पाणी राहील याची दक्षता घेण्यात आली असून जलसंपदा विभागामार्फत पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  पालखी मुक्काम, विसावा, ६५ एकर, वाळवंट येथे विद्युत वितरण कंपनीमार्फत तात्पुरती वीज कनेक्शन देण्याचे नियोजन झाले आहे. वारकऱ्यांना केरोसीन व गॅस मिळावा याचे नियोजन केले आहे’. 
  
बैठकीत मानाचे पालखी विश्वस्त व पंढरपुरातील नागरीकांनी  अनेक सूचना केल्या. या सूचनांवार  आवश्यक ती  कार्यवाही केले जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी उपस्थितांना दिले. प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी प्रास्ताविक करुन सादरीकरणाव्दारे तयारीची माहिती दिली.  अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी आभार मानले. बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले…...·        पालखी मार्गावर प्रत्येक २ कि.मी . वर वैद्यकीय पथक .·        पालखी मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त.·        नदीपात्रातील खड्डे बुजवणार·        पालखी मार्गावरील विद्युत वितरण कंपनीकडील ट्रॉन्स्फॉर्मरना कुंपण करणार.·        महाराष्ट्र राज्य  मार्ग परिवहन मंडळामार्फत सुमारे 3500 बसचे नियोजन·        65 एकर येथे मोबाईल टॉवर. 





-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget