.
.
.

महिला सरपंचांनी भागवली तहान,दोन गावांची वेश,ग्रामस्थांना प्रशासनाने सोडले वार्‍यावर...



टँकर देण्यासाठी प्रशासनाकडून टाळाटाळ

पंढरपूर,प्रतिनिधी
जनता व राज्यशासन यांच्यामध्ये महत्वाचा दुवा बनून शासकिय  योजना ग्रामीणभागापर्यत पोहचवण्याचे काम प्रशासनाकडून केले जाते.परंतु प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निष्काळजी पणाचा फटका दोन गावांच्या वेशीवर राहत असलेल्या उपरी(ता.पंढरपूर)येथील कोळीवस्तीवरील नागरीकांना बसत असल्यामुळे सरपंच सरस्वती मोहीती यांनी स्वत:टँकर सुुरु करून नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवली आहे.



पंढरपूर-सातारा रस्त्यापासून पुढे  सातारा नाला ते बाजीराव विहीर या रस्त्याला लागुण कोळी वस्ती आहे.येथील नागरीकांचे मतदान ओळखपत्र,आधारकार्ड उपरी येथील आहेत परंतु सदर वस्ती ही भंडीशेगाव हद्दीत येत असल्यामुळे वारंवार येथील नागरीकांना शासकिय योजनांपासून डावलले जात असते.घरकुलाच्या बाबतीतही अनेकांना डावलेले गेले असल्यामुळे बहुतांश नागरीक घरकुलापासून वंचित राहीले आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून या वस्तीवर तीव्र पाणी टंचाई होती याबाबत उपरी ग्रामपंचायतीच्या वतीने टँकरचा प्रस्ताव सादर करण्यात  आला परंतु लोकेशन भंडीशेगावचे दाखवत असल्यामुळे येथे टँकर सुरु करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. उपरी व भंडीशेगावच्या ग्रामसेवकांनी सर्व्हे केला परंतु प्रशासनाकडून त्यांना कोणताच सकारात्मक प्रतीसाद मिळाला नाही.त्यामुळे पाण्यासाठी वणवण करणार्‍या नागरीकांची तहाण भागविण्यासाठी सरंपच सरस्वती मोहीते यांंनी स्वत: पुढाकार घेवून कोळी वस्ती येथे दहा ते बारा हजार लिटरचा टँकर सुरु केला आहे.या टँकरचे पूजन जयहनुमान दुध संस्थेचे चेअरमन पै.साहेबराव नागणे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उपसरपंच आण्णासो नागणे,माजी सरपंच सुनिल नागणे,मा.उपसरपंच शहाजी मोहीते,संजय नागणे,ग्रा.पं सदस्य आप्पासो कोळी,सर्जेराव कोळी,माजी उपसरपंच विलास कोळी,अनिल नागणे,महेश नागणे,शंकर नागणे, श्रीकांत जगदाळे,नवनाथ कोळी,राजेंद्र कोळी व ग्रामस्थ उपस्थित होते.दररोज दोन ते तीन खेपा करून कोळी वस्तीवरील नागरीकांना टँकर द्वारे पाणी दिले जाणार आहे.सरपंच सरस्वती मोहीते यांनी स्वत: टँकर सुरु केल्यामुळे नागरीकांमधून समाधान व्यक्त करण्यात अ्राले.

दोन गावांच्या हद्दीमुळे कोळी वस्तीयेथील नागरीक शासकिय योजनांपासून वंचित राहत आहेत.याबाबत प्रशासनाकडे आम्ही वारंवार पाठपुरावा करीत आहोत परंतु प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही.टँकरच्या बाबतीतही तेच झालेे आहे.----सरस्वती मोहीते,सरपंच,उपरी






-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget