स्वेरीच्या एकवीस विद्यार्थ्यांची क्यू स्पायडर इंडस्ट्रीज कंपनीत निवड



पंढरपूरः-क्यू स्पायडर’या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील एकवीस विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
       आय.टी. क्षेत्राशी संबंधीत पुणे येथील ‘क्यू स्पायडर’या राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीचे एच आर. सुमित भागवत, अभिषेक कलकुर, सागर नाग व त्यांच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून इंजिनीअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील प्रथमेश म्हमाणे, फारुख सय्यद, विलास महाजन, पंकज पाटील सागर बागेवाडीकर व वैभव पवार हे सहा जण, कॉम्प्यूटर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंगचे प्राजक्ता लांबतुरे, प्रिती करकी,अनिसा शेख, संकेत कुलकर्णी, प्रियांका तेलंग, पूनम लावंड, शुभम मोरे, सोनल लामकाने, सुदर्शन अभिवंत हे नऊ जण तर इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगचे मयुरेश आडवळकर, हीना नाईकवाडी, अपर्णा पोतदार, दीक्षा जाधव, शाहिस्ता अत्तार व श्रीकांत कदम हे सहाजण असे मिळून ‘क्यू स्पायडर’ कंपनीत स्वेरीच्या एकूण २१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. 


श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये दररोज नवनवीन व आंतरराष्ट्रीय कंपन्या येतात आणि कंपनीसाठी पात्र असे विद्यार्थ्यांची निवड करतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात. याचा सखोल अभ्यास करून ‘मागणी तसा पुरवठा’ या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थीनींना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळप्रा. डी.ए. कुंभार व प्रा.एस.व्ही.दर्शने आदी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विषेशतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्तस्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्यउपप्राचार्यविभागप्रमुखइतर अधिष्ठाताप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी  कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.  


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget