स्वेरीत ‘इंडस्ट्री ४. ०’ याविषयावर पाच दिवशीय कार्यशाळा संपन्न



कन्सल्टंट अॅन्ड ट्रेनर व्हाईस प्रेसिडेंट डॉ. मराठेडॉ.आडवी व डॉ. नातू यांनी केले बहुमोल मार्गदर्शन
पंढरपूर- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागात पाच दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली यामध्ये आय. आय. टी. मुंबई येथून अभियांत्रिकीची पदवी संपादन केलेले, एन. आय.टी.आय.ई.मुंबई मधून पदव्युत्तर पदवी घेतलेले तसेच आय. बी. एमपरसिस्टंट सिस्टम्स मास्टेक लिमिटेड इत्यादी आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये कन्सल्टंट अॅन्ड ट्रेनर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून भरीव कार्य केलेले डॉ.अतुल मराठेडॉ.रमेश आडवी व डॉ.सुदर्शन नातू यांनी या कार्यशाळेत बहुमोल मार्गदर्शन केले.
       संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांचे नेतृत्वाखाली या  कार्यशाळेचे समन्वय प्रा. व्ही. एस. क्षीरसागर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगून इंडस्ट्री ४. ०’ म्हणजे नेमके काय याची माहिती देवून कार्यशाळेसाठी आलेल्या पाहुण्यांची ओळख सांगितली. यावेळी डॉ. अतुल मराठे तसेच आय.आय.टी.मुंबई मधून १९७९ साली बी.टेक पदवी संपादित करून आय.आय.एम. बेंगलोर मधून पी.जी.डी.एम. पूर्ण केलेले डॉ. रमेश आडवी आणि पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून पदवी संपादन करून आय.आय.टी.मुंबई मधून १९८२ साली एम.टेक झालेले डॉ.सुदर्शन नातू या प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन केले. बहुमोल मार्गदर्शनातून मान्यवरांनी अनेक बाबींवर मार्गदर्शन केले.


 त्यातून उद्योग आणि अभियांत्रिकी महाविध्यालय यांच्यातील परस्पर संबंध वाढविणे काळाची गरज आहे. औद्योगिक क्षेत्राबरोबर संबंध वाढविणे गरजेचे आहे.ब्लॉक चेनडाटा सायन्स आणि आय.ओ. टी. या विषयासंबंधी शिक्षकाना सखोल माहिती असावी. शिक्षक हा औद्योगिक क्षेत्रात आणि असलेले संबंध आणखी वाढविण्याचा प्रयत्न करावा.हा कौशल्याचाच एक भाग असून यावर शिक्षकांनी आपल्या अदभूत कौशल्याने प्रभुत्व मिळवावे आणि असे कौशल्य वाढविण्यासाठी अशाकार्यशाळेची नितांत गरज आहे. यासाठी नियोजन खूप महत्वाचे आहे. सध्याच्या युगात स्वेरीसारख्या अशासकीय शिक्षण संस्थेने काळाची गरज ओळखून कार्यशाळेचे आयोजन केले. त्यावरून स्वेरीचेनियोजन किती अप्रतिम असते याची प्रचिती येते. यात खरोखरच स्वेरीच्या व्यवस्थापनाचे कौशल्य दिसून येते. शिक्षकांनी देखील शा कार्यशाळेत वारंवार सहभागी व्हावे. त्यामुळे बहुमोल शिक्षण मिळूनजागतिक पातळीवरील स्पर्धेच्या युगात आपली तयारी होत राहते. यासाठी अशा कार्यशाळांचे सातत्याने आयोजन करावे. यावेळी संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. संतोष साळुंखे, प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजीत गिड्डे, सिव्हील इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. दरम्यान पाहुण्यांनी स्वेरीअंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांची पाहणी केली व माहिती जाणून घेतली.






-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget