.
.
.

सिंहगडच्या १२ विद्यार्थ्याची क्रियेटिव टुल्स अँड कॉम्पोन्टंस् कंपनीत निवड


      पंढरपूर (प्रतिनिधी) भारतातील एक प्रमुख अभियांत्रिकी, ऑटोमोटिव्ह आणि आयटी मध्ये कार्यरत असणारी हि कंपनी क्रिएटिव्ह साधने व घटक विविध प्रकारच्या क्षेत्रातील ग्राहकांसाठी ऑटोमेटिक, मटेरियल हँडलिंग, एनर्जी रीन्यूएबल आणि ऑइल अँड गॅस, डिझेल इंजिन, हायड्रोलिक, एरोस्पेस, बायो-मेडिकल इत्यादीं मधील ग्राहकांसाठी परिशुद्धता मशीन तयार करीत आहे. भारतीय बाजारपेठेतील क्रिएटिव्ह टूल्स घटकांमधील उत्पादनाची गुणवत्ता आणि वेळेच्या वेळी वितरणासाठी एक चांगली प्रतिष्ठा मिळवून दिली आहे अशा या क्रियेटिव टुल्स अँड कॉम्पोन्टंस् प्रा. लि. कंपनीत पंढरपूर सिंहगड मधील १२ विद्यार्थ्याची कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.



      पंढरपूर सिंहगड संस्थेचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्यातील गुण ओळखून गुणात्मक शिक्षण देणारी संस्था म्हणून नावलौकिक आहे. आजच्या स्पर्धात्मक वातावरणात टिकण्यासाठी सक्षम प्रभावशाली शिक्षण देत असलेल्या कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील अभिजित भोसले, सागर गंगनमले, मिथुन कदम, बबलू कांबळे, शैलेश कांबळे, जीवन कोळी, सुमित म्हेत्रे, अक्षय मुळे, पवन पन्हाळकर, पवन पवार, अमोल साळुंखे, शुभम मोरे आदी विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हूद्वारे निवड करण्यात आली आहे.
      क्रियेटिव टुल्स अँड कॉम्पोन्टंस् प्रा. लि. कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगेडॉ. चेतन पिसेडॉ. रविंद्र व्यवहारेप्रा. सुभाष पिंगळेप्रा. श्रीनिवास गंजेवार, डॉ. अल्ताफ मुलाणीप्रा. अनिल निकमप्रा. सोमनाथ कोळीप्रा. भारत आदमिलेप्रा. दिपक कोष्टीप्रा. सुर्यकांत पाटीलप्रा. अमित भादुले आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले. 
















-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget