क.भा. पाटील महाविद्यालयाचा वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रमात सक्रीय सहभाग



पंढरपूर : पंढरपूरचे अवघे वातावरण भक्तीमय बनल्याने येथील प्रत्येक घटक विठ्ठलाच्या भेटीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सेवा पुरविण्याचे काम करतो. त्यामुळे पंढरीला आलेल्या वारकऱ्याला माहेरी आल्याचे सुख भेटते.
वारकऱ्यांच्या सेवेत आपला वाटा देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वारकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.


उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या वतीने आयोजिक करण्यात आलेल्या ‘स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, निसर्ग वारी’ या उपक्रमात येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उस्फुर्त सहभाग घेवून पंढरीतील वारकऱ्यांची सेवा केली आहे.


महाविद्यालयाच्या जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी वारीपूर्व कालावधीत नामदेव पायरी ते घाट परिसरात स्वच्छता केली. १० जुलै रोजी वाखरी येथील पालखी तळावर विशेष श्रमसंस्कार शिबिर घेण्यात आले. विसावा विठ्ठल मंदिर परिसर, मेजर कुणाल गोसावी स्मारक परिसरात स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात महाविद्यालयातील जवळपास १००० विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार योगदानात सहभाग दिला. 

वारकऱ्यांना ५० हजार पत्रावळ्यांचे वाटप करण्यात  आले. त्याचबरोबर पथनाट्याद्वारे वारकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मोबाईल टॉयलेट मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली. त्याचबरोबर वारकऱ्यांच्या उष्ट्यापत्रावळीचे कं पोष्ट खतात रुपांतर करण्याचे काम केले. त्याचबरोबर पंढरपूर नगरपालिकेस १५० स्वयंसेवक, आरोग्य विभागास १५० स्वयंसेवक व पोलीस विभागास १५० स्वयंसेवक पुरविण्याचे काम केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ४०० स्वयंसेवकांची राहण्याची सोय महाविद्यालयाने केली आहे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांच्या हस्ते मोफत पाणपोईचे उदघाटन करण्यात आले असून सदर पाणपोई तीन दिवस



चालणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजनाविभागाचे चेअरमन प्रा. दादासाहेब हाके यांनी दिली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा. जी. बी. भगत, प्रकल्प अधिकारी डॉ. सी. एन. काळे, सदस्य डॉ. फैमिदा बिजापुरे, प्रा. सुभाष कदम, डॉ. रमेश शिंदे, डॉ. दत्ता डांगे, डॉ. ए. एल. शेख, डॉ. भारत सुळे, प्रा. अमोल मोरे, प्रा. सुहास शिंदे आदी शिक्षक व शिक्षकेतर सेवक बहुसंख्येने हजर होते.








-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget