.
.
.

सा. पंढरी संदेशचे वतीने श्रीज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा


    श्रीक्षेत्र पंढरपूर - येथील वारकरी संप्रदायाचे मुखपत्र सा. पंढरी संदेशचे वतीने श्रीज्ञानेश्‍वर महाराज व श्रीतुकाराम महाराज आदि पालख्यांचे प्रस्थान स्वगृही पोहचेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह दि. 17 ते 25 जुलै 2019 अखेर ह. भ. प. प्रकाशमहाराज देवडीकर यांचे मार्गदर्शनाखाली भव्य प्रमाणांत संपन्न होणार आहे.
  
  दररोज दु. 3 ते 5। यावेळेत श्रीज्ञानेश्‍वरीचे सामुदाईक पारारण होईल. तसेच दु. 5। ते 6। प्रवचने होतील. हा सप्ताह हरिदास वेशीतील श्रीयाज्ञवल्क्य आश्रमात होणार आहे.
    सप्ताहात ह. भ. प. अनिल महाराज बडवे, अनिल महाराज हरिदास, श्रीराम महाराज बनवसकर, बाबुराव महाराज वाघ, रामकृष्णमहाराज वीर, भाऊसाहेब महाराज गोसावी, मारुती महाराज तुनतुनेशास्त्री आदिंची प्रवचने होतील.
    दि. 25 जुलै रोजी काल्याचे  कीर्तन ह. भ. प. बाळशास्त्री हरिदास यांचे होईल. तरी पंचक्रोशीतील भाविकभक्तांनी या पारायण सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन श्री. गजाननराव बिडकर यांनी केले आहे.


















-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget