.
.
.

श्री साईबाबा पालखीचे कसबा गणपती मंदिर येथून शिर्डीकडे प्रस्थान साई रामाच्या जय घोषात हजारो साई भक्तांच्या साक्षीने  श्री साईबाबा पालखीचे   कसबा गणपती मंदिर येथून शिर्डीकडे प्रस्थान झाले . यावेळी प. पु. श्री रमेश गिरीजी महाराज बेट कोपरगाव यांच्या शुभहस्ते व महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली आणि  आमदार माधुरीताई सतीशसेठ मिसाळ , पुणे महापालिका भाजपचे गटनेते श्रीनाथ भिमाले , नगरसेवक रविंद्र धंगेकर , साई भक्त माजी आमदार प्रकाश देवळे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक बी .जे. देशमुख ,  विजय मर्लेचा यांच्या उपस्थितीत श्री साईबाबा पालखीचे श्री क्षेत्र शिर्डीकडे नगरमार्गे प्रस्थान झाले  . हा सोहळा रविवार दि. 14 जुलै 2019 रोजी शिर्डीस पोहचेल . यंदाच्या पालखी सोहळ्याचे 31 वे वर्ष आहे .

        

 या प्रसंगी पुणे महानगरपलिकच्यावतीने पुणे शिर्डी महामार्गावर वृक्ष लागवडीसाठी  रोपे देण्यात आली . या प्रसंगी महापौर मुक्ता टिळक यांनी शिर्डी येथील रुग्णालयाच्या धर्तीवर पुण्यात भव्य रुग्णालय उभारू . त्यासाठी श्री साई पालखी सोहळा समितीच्यावतीने पुणेकरांच्या आरोग्य  सेवेत उभे करावे . अशी अपक्षा महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त करून शिर्डीमध्ये पुणेकर साई भक्तांसाठी भक्त निवास होणार आहे त्याला पुणे महापालिकेच्यावतीने सर्वोपतरी मदत करू. असे आश्वासन दिले .

        या प्रसंगी  प. पु. श्री रमेश गिरीजी महाराज बेट कोपरगाव  यांनी प्रस्थान समयी साई बाबा हे दैवत जग प्रसिध्द झाले असून त्यांनी देखील झाडे लावा , झाडे जगवा ते तत्व शिर्डीमध्ये झाडे लावून आचरणात आणले होते . तसेच , त्यांनी पालखी समिती हि पालखी सोहळ्यात साई भक्त नामस्मरण ज्या पद्धतीने करतात त्यामुळे उत्तम संस्कार होतात व प्रपंचात आनंद मिळतो . या पालखीत व्यसनमुक्तीचे उपक्रम राबविले जातो , त्याचे त्यांनी विशेष कौतुक केले .

        
या पालखीमध्ये श्री साईबाबा पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष शाम वीर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिर्डीमध्ये भक्त निवासासाठी जागा घेतली आहे . त्या जागेवर भक्त निवास बांधण्यासाठी साई भक्तांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन त्यांनी साईभक्तांना केले .

       स्वछ भारत अभियानांतर्गत स्वछतेसाठी दहा लाख रुपये किमतीचे दोन  आधुनिक मोबाइल टॉयलेट्स समितीने पालखीबरोबर घेतले आहेत . या पालखीत महाराष्ट्राच्या विविध भागातील साईभक्त सहभागी झाले होते साईबाबाच्या पादूकांसाठी   साईरथ   आधुनिक सुसुविधांनी तयार केला आहे .  

      या पालखीमध्ये श्री साईबाबा पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष शाम वीर , कार्याध्यक्ष नाना पगडे , सेक्रेटरी महावीर क्षीरसागर , खजिनदार विजय मेथे , विश्वस्त गोकुळ राहुरकर , किरण कदम , देविदास फडतरे , रमेश भोसले , संजय खरोटे आदी मान्यवर व मोठया संख्येने साईभक्त सहभागी झाले होते .


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget